Ravindra Jadeja Joins BJP: स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजाचा भाजपमध्ये प्रवेश; पत्नी रिवाबाने शेअर केले फोटो
रिवाबाने तिचे आणि रवींद्र जडेजाची मेंबरशिप कार्ड शेअर केले आहेत.
Ravindra Jadeja Joins BJP: भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. सध्या सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान जडेजाने प्राथमिक सदस्यत्व (Primary Membership) घेऊन पक्षात प्रवेश केला आहे. त्यांची पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) भाजपच्या सदस्या असून त्या गुजरातच्या जामनगर मतदारसंघातून पक्षाच्या आमदार आहेत.
जडेजाच्या भाजपा प्रवेशाची बातमी रिवाबाने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली. रिवाबाने तिचे आणि रवींद्र जडेजाची मेंबरशिप कार्ड शेअर केले आहेत. दरम्यान, रिवाबा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'सदस्यत्व मोहिमेची सुरुवात मी माझ्या घरापासून केली आहे. काल भाजपने सदस्यत्व मोहिमेचा एक भाग म्हणून पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ही मोहीम भाजप शहर व जिल्ह्याच्या वतीने राबविण्यात आली होती.' (हेही वाचा - Ravindra Jadeja Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात रवींद्र जडेजाच्या नावावर 'हा' खास विक्रम, 4 वेळा केला असा पराक्रम)
रवींद्र जडेजाचा भाजपमध्ये प्रवेश -
रिवाबा जडेजा यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2022 मध्ये त्यांना जामनगर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली. त्यांनी AAP उमेदवार करशनभाई कर्मूर यांचा पराभव करून विजय मिळवला होता. निवडणुक प्रचारादरम्यान रवींद्र जडेजा रिवाबा यांच्या बाजूने प्रचार करताना दिसले होता.