भारताला लक्ष्य करण्यासाठी Dawood Ibrahim ने बनवले विशेष युनिट; अनेक राजकारणी आणि उद्योगपती हिटलिस्टवर - NIA

ईडी इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर, त्याचे साथीदार आणि टोळीतील सदस्यांची चौकशी करणार आहे.

Dawood Ibrahim (PC -Facebook)

अंडरवर्ल्ड डॉन आणि फरार गुंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) ने भारताला लक्ष्य करण्यासाठी एक विशेष युनिट तयार केल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) उघड केले आहे. तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार राजकीय नेते आणि प्रसिद्ध उद्योगपतींची नावे हिटलिस्टवर आहेत.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एफआयआरमध्ये उघड झाले आहे की, दाऊद इब्राहिम त्याच्या विशेष युनिटसह देशाच्या विविध भागात हिंसाचार भडकवण्याच्या उद्देशाने स्फोटक आणि प्राणघातक शस्त्रे वापरून देशावर हल्ला करण्याची योजना आखत होता. याशिवाय दाऊद इब्राहिमचे लक्ष दिल्ली आणि मुंबईवरही आहे. (वाचा - SP Leader Ahmad Hasan Passed Away: समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद हसन यांचे निधन, लखनऊच्या लोहिया रुग्णालयात सुरू होते उपचार)

ईडीने अलीकडेच दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दहशतवादी कारवायांमध्ये आर्थिक मदत केल्याबद्दल मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडी इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर, त्याचे साथीदार आणि टोळीतील सदस्यांची चौकशी करणार आहे. शुक्रवारी इक्बाल कासकरला मनी लाँड्रिंग प्रकरणात 24 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, ईडीने न्यायालयाला सांगितले की, कासकरच्या चौकशीत महत्त्वाची तथ्ये समोर येऊ शकतात. कारण तो मुख्य सूत्रधार आणि सिंडिकेटचा नेता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, ईडीने इब्राहिमची दिवंगत बहीण हसिना पारकर, कासकर तसेच गँगस्टर छोटा शकीलच्या नातेवाईकांशी संबंध असलेल्या लोकांच्या मुंबईतील सुमारे 10 ठिकाणी छापे टाकले होते.