South Africa Shootout: लिम्पोपोमध्ये पोलिसांनी 18 सशस्त्र दरोडेखोरांना गोळीबारात केले ठार

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारांत पोलिसांनी 18 सशस्त्र दरोडेखोरांना ठार केले ही घटना लिम्पोपोमधील आहे.

gun shot representative image

South Africa Shootout: दक्षिण आफ्रिकेत गोळीबारांत पोलिसांनी 18 सशस्त्र दरोडेखोरांना ठार केले ही घटना लिम्पोपोमधील आहे. मृतांमध्ये 16 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांचा  ट्रक लुटण्याचा कट होता. दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये सुमारे 90 मिनिटे चाललेल्या गोळीबारात 18 दरोडेखोरांचा मृत्यू झाला आणि घटनास्थळावरून सुमारे चार संशयितांना अटक करण्यात आली. पत्रकारांशी संवाद साधताना, दक्षिण आफ्रिकन पोलीस सेवा चे राष्ट्रीय पोलीस आयुक्त, फॅनी मासेमोला म्हणाले की लिम्पोपो येथे पोलिसांशी झालेल्या गोळीबारानंतर 18 दरोडेखोरांना गोळ्या घालण्यात आल्या. या गोळीबारात एक पोलीस अधिकारीही जखमी झाला आहे. चार संशयित आरोपीला या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement