देशात लॉकडाऊन असताना 6 कोरोना बाधितांची दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी; सरकारकडून उपस्थितांची चाचणी
या 6 जणांचा सोमवारी तेलंगणामध्ये मृत्यू झाला आहे. त्यानंतर सरकारकडून या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांची चाचणी घेण्यात येत आहे. या सहा जणांनी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
देशात लॉकडाऊन (Lockdown) असताना 6 कोरोना बाधितांनी (Coronavirus) दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली. या 6 जणांचा सोमवारी तेलंगणामध्ये मृत्यू झाला आहे. त्यानंतर सरकारकडून या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांची चाचणी घेण्यात येत आहे. या सहा जणांनी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
दिल्लीतील मरकज तबलिगी जमातच्या मुख्यालयात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या लोकांना खासगी बसेसने शहरातील विविध रुग्णालयात कोरोनाच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा - भारतात गेल्या 24 तासांत COVID-19 चे 227 नवीन रुग्ण, देशात रुग्णांची संख्या 1251 वर)
या सहा जणांनी 13 ते 15 मार्चच्या दरम्यान धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सध्या दिल्ली सरकारने या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. सरकारने आतापर्यंत 100 जणांची चाचणी केली आहे. आज या सर्वांचे रिपोर्ट येणार आहेत. देशात लॉकडाऊन असताना या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.