Singrauli Road Accident: मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे मोटारसायकल विजेच्या खांबाला धडकल्याने 3 जणांचा मृत्यू

पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा मुख्यालयापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या सरौंधा गावाजवळ सोमवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Singrauli Road Accident: मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात मोटारसायकल विजेच्या खांबाला धडकल्याने तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा मुख्यालयापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या सरौंधा गावाजवळ सोमवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. जियावन पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र पाठक यांनी सांगितले की, मोटारसायकलस्वाराचा वाहनावरील ताबा सुटला, त्यानंतर वाहन विजेच्या खांबाला धडकले. हे देखील वाचा: Pune: हिवाळ्यातील थंडीपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कात्रज प्राणीसंग्रहालयात बसवण्यात आले हीटर

 पाठक यांनी सांगितले की, दादुलाल कोल (31), सीताशरण कोल (30) आणि रामप्रकाश कोल (30) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून तपास सुरू आहे.


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif