Janmashtami 2024: देशभरात श्री कृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष, मथुरा आणि वृंदावन फुलांनी सजली

मथुरा, वृंदावन आणि कृष्ण मंदिरात भाविकांनी पहाटे पासूनच मोठी गर्दी केली आहे. जन्माष्टमीचा सण भगवान श्री कृष्णाचा जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो.

Janmashtami 2024: Photo credit X, ANI

Janmashtami 2024:  गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्रीहरी, आज संपूर्ण देशात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करत आहेत. मथुरा, वृंदावन आणि कृष्ण मंदिरात भाविकांनी पहाटे पासूनच मोठी गर्दी केली आहे. जन्माष्टमीचा सण भगवान श्री कृष्णाचा जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. यावेळी त्यांची 5251 वी जयंती आहे. मथुरा आणि वृंदावनच्या मंदिरांमध्ये हा उत्सव मोठ्या जल्लोषानेसाजरा केला जात आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिराचे गर्भगृह कंसाच्या कारागृहाच्या रूपात सजवले गेले आहे. (हेही वाचा- मुंबई मधील इस्कॉन जुहू मध्ये जन्माष्टमीचा सोहळा कुठे, कधी पाहू शकाल?)

जन्माष्टमीच्या भव्य उत्सवासाठी देशभरातील मंदिरे आणि चौक सजवण्यात आले आहेत. मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी आज पाहायला मिळत आहे. भाविक भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीने झाले आहे. मथुरा नगरीत आज श्री कृष्ण जन्न थाटामाटात साजरी केली जात आहे. जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर मथुराचे श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर भाविकांसाठी २० तास खुले ठेवण्यात आले आहे.

मथुरेत जन्माष्टमी उत्सव

इस्कॉन मंदिर अहमदाबाद

दिल्लीत जन्माष्टमीचा उत्सव

मुंबईच्या इस्कॉन मंदिराची आरती

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातही विशेष भस्म आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शुभदिनी देशभरातील कृष्ण मंदिरांमध्ये विशेष उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री कृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहुर्त 
हिंदू धर्मानुसार, यंदा श्री कृष्णजन्माष्टमीचा शुभ मुहूर्त २६ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३९ ते २७ ऑगस्ट रोजी पहाटे ०२. १९ पर्यंत आहे. घरोघरी श्रीकृष्णाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी १२:०० ते १२:४४ असा असेल, यावेळी श्रीकृष्णाची जयंती साजरी केली जाईल. भगवान श्रीकृष्णाची ही ५२५१ वी जयंती आहे. यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी द्वापार युगाच्या ४५ मिनिटांसारखा योगायोग घडत आहे, जो अत्यंत शुभ मानला जात असल्याचे जाणकारांचे मत आहे.