Death Due to Balloon: धक्कादायक! फुग्यामुळे 10 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, उत्तर प्रदेशातील घटना

एक घटना उत्तर प्रदेशात घटना घडली आहे. एका दहा वर्षाच्या मुलाचा फुग्यामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील अमरोह गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Death Due to Balloon: धक्कादायक! फुग्यामुळे 10 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, उत्तर प्रदेशातील घटना
Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Death Due to Balloon: खेळता खेळता फुग्यामुळे कोणाचा जीव जाऊन शकतो अशा विचार देखील या आधी कोणीच केला नसावा, दरम्यान अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घटना घडली आहे. एका दहा वर्षाच्या मुलाचा फुग्यामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील अमरोह गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलगा फुग्यासोबत खेळत होती. खेळता खेळता एक फुगा फुगवताना (inflating the balloon) मुलाचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी मुलाला उपचारासाठी रुग्णालायत दाखल केलं पण तोवर उशीर झाला होता.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अमरोह येथील गजरौला गावातील ही घटना घडली. गुरुवारी  मुलगी फुगा फुगवत होती दरम्यान हवा जास्त झाल्याने अचानक फुटला आणि याचा तुकडा मुलाच्या तोडांतून श्वसनलिकेत जाऊन अडकला. श्वासनलिकेत अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. बऱ्याच वेळ त्रास वाढल्याने मुलगा जमिनीवर बेशुध्द पडला. ते पाहून कुटुंबियांना धक्काच बसला. (हेही वाचा- बायकोचा आवाज ऐकताच पतीची आत्महत्या)

नातेवाईंकानी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तोवर उशीर झाला आणि मुलाने प्राण सोडले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबियांवर मोठा दुखाचे डोंगर कोसळला. कोणालाच विश्वास बसत नाही, खेळता खेळता मुलगा जग सोडून जाईल. या घटनेनंतर गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2023 01:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).