Radhika Gupta Criticises Airlines Breakfast: शार्क टँकमधील राधिका गुप्ता एअरलाइन्सच्या ब्रेकफास्टवर संतापल्या; सँडविच बंद करण्याची केली मागणी
एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी फ्लाइटमध्ये दिल्या जाणाऱ्या सँडविचबद्दल संताप व्यक्त केला आहे. पराठे, इडली आणि ढोकळा सारखे आरोग्यदायी आणि चविष्ट भारतीय नाश्ता पर्यायासाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.
Radhika Gupta Criticises Airlines Breakfast: एडलवाईस (Edelweiss)म्युच्युअल फंडाच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता (Radhika Gupta)यांनी एक्स X वर एअरलाइन्समध्ये दिल्या जाणाऱ्या नाश्ताबद्दल असंतोष व्यक्त केला. त्याशिवाय, फ्लाइटमध्ये दिले जाणारे सँडविच बंद करण्याची मागणी केली. न्याहारी ज्यामध्ये "चीजने भरलेल्या ब्रेडचे दोन तुकडे" असतात. गुप्ता यांनी खाद्यपदार्थात आरोग्यदायी, चवदार आणि परवडणारे नाश्त्या पर्याय उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. ज्यात पराठे, इडल्या आणि ढोकळा अशांचा समावेश होतो. "हा भारत आहे, पाश्चिमात्य देश नाही. आपण अधिक चांगले करू शकता," असे या पोस्टमध्ये राधिका गुप्ता यांनी म्हटले आहे. एअरलाइन्सना सर्जनशील होण्यासाठी अधिक प्रादेशिक नाश्त्याचे पर्याय देण्याचे आवाहन केले.
सँडविच बंद करण्याची केली मागणी
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)