Ghaziabad Meerut Expressway Accident: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातून एक लज्जास्पद व्हिडिओ समोर आला आहे. गाझियाबाद मेरठ एक्स्प्रेस वेवर विजय नगरजवळ दुधाचा टँकर आणि ट्रक यांच्यात भीषण टक्कर झाली. या धडकेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून कंडक्टर गंभीर जखमी अवस्थेत आहे. लोक मदत करण्याऐवजी दूध लुटण्यात मग्न होते. टँकरमधील दूध पाहून आजूबाजूला राहणारे लोक धावत आले आणि त्यांनी दूध बाटल्यांमध्ये भरण्यास सुरुवात केली.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमी कंडक्टरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर मृत ट्रक चालकाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघातानंतरचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक दूध लुटण्यात व्यस्त असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.हेही वाचा: Ghaziabad Road Accident: गाझियाबादमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दिली धडक, 4 ठार, 24 जखमी
ये कितना शर्मनाक है...
उत्तर प्रदेश के जिला गाजियाबाद में दूध टैंकर ड्राइवर की रोड एक्सीडेंट में मौत हो गई, और भीड़ दूध लूटने में जुटी रही। pic.twitter.com/YKhAFHhyoP
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) August 6, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन्ही वाहनांची धडक झाली. तेव्हा दिल्लीहून दुधाने भरलेला टँकर (HR55R- 8599) जात होता. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांना मागून धडक दिली.
अपघात एवढा भीषण होता की टँकरचे नुकसान तर झालेच, शिवाय ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. धडकेची तीव्रता जास्त असल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. व कंडक्टर गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कंडक्टरला रुग्णालयात नेले. 45 वर्षीय प्रेम सागर असे मृत चालकाचे नाव आहे.