Jaipur Petrol Pump Fire: जयपूरमध्ये पॅट्रोल पंपावर सीएनजी टँकर आणि ट्रक्टरची जोरदार धडक; आगीत 10-12 सीएनजी वाहने जळून खाक, अनेक जण जखमी झाल्याचा अंदाज
दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Jaipur Petrol Pump Fire: जयपूरमधील भांक्रोटा येथे पॅट्रोल पंपावर सीएनजी टँकर आणि ट्रक्टरची जोरदार धडक होऊन आगीच्या घटनेत(Jaipur Petrol Pump Fire) अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेत दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पाच रुग्णवाहिका आणि रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सध्या आगीवर मियंत्रण मिळवण्यात आले असून बचावकार्यही वेगाने सुरू आहे. या आगीत दहा ते बारा सीएनजी वाहने जळून खाक झाली आहेत. (Car Caught Fire On Jogeshwari Bridge: मुंबईतील जोगेश्वरी पुलावर कारला भीषण आग, पहा व्हिडिओ)
आग कशी लागली?
वाहनांच्या धडकेमुळे एकाच वेळी डझनभर वाहनांना आग लागली. सीएनजी ट्रकमध्ये एकामागून एक स्फोट झाले. आजूबाजूच्या वाहनांनाही स्फोटाचा फटका बसला. काहींनी वाहनांमधून खाली उतरून आपला जीव वाचवला. या आगीत डझनहून अधिक लोक जळून खाक झाली आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. अग्निशमन दल स्थानिक लोकांच्या मदतीने वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत.(Navi Mumbai Fire: नवी मुंबई मध्ये Bhumiraj Costa Rica इमारती मध्ये 25 या मजल्यावर भडकली आग (Watch Video))
अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाचच्या सुमारास भांक्रोटक डी क्लॉथॉनजवळ दोन ट्रकची टक्कर झाली. त्यानंतर सीएनजी टँकमध्ये मोठा स्फोट झाला. या आगीत प्रवाशांनी भरलेली बसही जळून खाक झाली. काही जणांनी वेळीच बसमधून उतरून आपला जीव वाचवला, तर 12 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांना नागरी संरक्षण दलाने स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यामध्ये मोठ्या आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना सवाई मानसिंग हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)