Stock Market Crash: सेन्सेक्स 1109 अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी रुपयांचे नुकसान, एका दिवसात बुडाली कित्येक महिन्यांची कमाई
बहुतेक 3,526 समभाग लाल रंगावर व्यवहार करत होते. आज गुंतवणूकदारांचे तब्बल 14 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गुंतवणूकदारांची एकूण संपत्ती मागील सत्रातील 385.64 लाख कोटी रुपयांच्या मुल्यांकनापेक्षा 371.69 लाख कोटी रुपयांवर घसरली आहे.
Stock Market Crash: आज शेअर बाजारात (Stock Market) मोठी घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स 1109 अंकांनी घसरून 72,558 वर आला, मिड-कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये लक्षणीय विक्री झाली. आज गुंतवणूकदारांचे तब्बल 14 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गुंतवणूकदारांची एकूण संपत्ती मागील सत्रातील 385.64 लाख कोटी रुपयांच्या मुल्यांकनापेक्षा 371.69 लाख कोटी रुपयांवर घसरली आहे.
पॉवरग्रीड, एनटीपीसी, टाटा स्टील, भारती एअरटेल, टायटन कंपनी आणि टाटा मोटर्स यांसारख्या समभागांनी सेन्सेक्सवर झालेल्या नुकसानीमध्ये अग्रगण्य योगदान होते. एकूण 223 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली. ज्याने बाजारातील व्यापक नकारात्मक भावना अधोरेखित केली. तसेच BSE वर केवळ 89 समभागांनी त्यांच्या 52-आठवड्यांचा उच्चांक गाठला. (वाचा - World’s First AI Software Engineer: कॉग्निशनने लॉन्च केला जगातील पहिला एआय इंजिनीअर; लिहू शकतो कोड, बनवू शकतो सॉफ्टवेअर)
आज केवळ 3,926 पैकी केवळ 351 समभाग हिरव्या रंगात व्यवहार करत होते. बहुतेक 3,526 समभाग लाल रंगावर व्यवहार करत होते, तर 66 समभाग अपरिवर्तित राहिले. अलीकडेच सेबी प्रमुखांनी मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांबद्दल चिंता व्यक्त केली होती. सेबी त्यांच्यावर बारीक नजर ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले होते. सेबीच्या या वक्तव्यानंतर बाजारातील वातावरण बदलले, त्याचा परिणाम म्हणजे आज बाजारात जोरदार विक्री झाली. स्मॉल कॅप आणि मिडकॅप निर्देशांकांसोबतच इतर निर्देशांकांमध्येही मोठी घसरण झाली आहे. (वाचा -Online Fraud Training: अवघ्या 21 वर्षीय विद्यार्थ्याने 500 तरुणांना दिले ऑनलाइन फसवणुकीचे प्रशिक्षण; टेलीग्राम चॅनेल आणि इतर तंत्रे ऑपरेट करण्यास शिकवले, पोलिसांकडून अटक)
तथापी, अदानी समभागांच्या घसरणीमुळे, अदानी समूहाचे मार्केट कॅप 90,000 कोटी रुपयांनी कमी झाले आणि गौतम अदानी 100 अब्ज डॉलरच्या क्लबमधून बाहेर पडले. बुधवारी अदानीच्या सर्व शेअर्समध्ये घसरण झाली, त्यापैकी अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स सर्वाधिक 9 टक्क्यांनी घसरले. याशिवाय अदानी टोटल गॅस 7%, अदानी एंटरप्रायजेस 6%, अदानी विल्मर 4%, अदानी पोर्ट 5%, अदानी ग्रीन सोल्यूशन 4.5% आणि अदानी पॉवर 5% ने घसरले.