IPL Auction 2025 Live

Lal Krishna Advani Health Update: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीत सुधारणा; एम्समधून मिळाला डिस्चार्ज

96 वर्षीय अडवाणी यांना या वर्षाच्या सुरुवातीला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात आला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अडवाणी भारताचे उपपंतप्रधान होते.

Lal Krishna Advani (PC - Wikimedia Commons)

Lal Krishna Advani Health Update: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना बुधवारी रात्री नवी दिल्लीतील (New Delhi) एम्स (AIIMS) मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. भाजप नेत्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. 96 वर्षीय अडवाणी यांना या वर्षाच्या सुरुवातीला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात आला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अडवाणी भारताचे उपपंतप्रधान होते.

अडवाणी आणि जनसंघाच्या इतर अनेक सदस्यांनी 1980 मध्ये जनता पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) ची स्थापना केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वालपेयी हे भाजपचे पहिले अध्यक्ष होते. अडवाणी यांनी 1989 मध्ये नवी दिल्लीतून पहिली लोकसभा निवडणूक लढवली होती. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून रामजन्मभूमीवर राम मंदिर उभारण्याच्या मागणीसाठी त्यांनी रथयात्रा काढली होती. (हेही वाचा -President Droupadi Murmu Parliament Speech: 'आणीबाणी हा राज्यघटनेवरील सर्वात मोठा हल्ला होता'; संसदेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती मुर्मू यांचे वक्तव्य)

अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची येथे झाला. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये प्रवेश केला. आरएसएसचे सचिव म्हणून अडवाणींनी अलवर, भरतपूर, कोटा, इतर भारतीय शहरांमध्ये काम केले. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली होती. पक्षाच्या स्थापनेपासून अडवाणी हे भाजपचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी पहिल्यांदा 1986 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर 1990 पर्यंत हे पद भूषवले.

यानंतर, त्यांनी 1993 ते 1998 आणि पुन्हा 2004-2005 दरम्यान व्यंकय्या नायडू यांच्या राजीनाम्यानंतर हे पद भूषवले. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात अडवाणी यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले. त्यानंतर, त्यांनी त्यांच्या आणि मुहम्मद अली जिना यांच्यावर केलेल्या एका टिप्पणीवरून झालेल्या वादानंतर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांची जागा राजनाथ सिंह यांनी घेतली.