Karnataka Shocker: अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी स्कूल बस चालक अटकेत

पोलिसांनी सांगितले की, चालकाने शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा गुन्हा कबूल केल्यानंतर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Karnataka Shocker: अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी स्कूल बस चालक अटकेत
Molestation | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कर्नाटकातील (Karnataka) सक्करायपट्टणा (Sakkarayapatna) येथे शाळकरी मुलींचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) शनिवारी एका व्यक्तीला अटक (Arrested) केली. आरोपी हा स्कूल बस चालक असल्याचे सांगण्यात येत असून त्याने विद्यार्थ्यांना घरी किंवा शाळेत सोडताना हा गुन्हा केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, चालकाने शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा गुन्हा कबूल केल्यानंतर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजप्पा हा 50 वर्षांचा असून त्याने आपले प्रायव्हेट पार्ट दाखवून मुलींना अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप आहे. एफआयआर दाखल करण्यात आला असून सध्या तपास सुरू आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हेही वाचा UP Horror: दोनचा पाढा न आल्याने शिक्षकाने मुलाच्या हातावर चालवली ड्रिल मशीन; Kanpur मधील धक्कादायक घटना

आरोपींविरुद्ध IPC च्या कलम 354A(1)(iv) आणि POCSO कायद्याच्या कलम 8 आणि 12 अंतर्गत अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्याला पोलीस ठाण्यात आणण्यापूर्वी गावकऱ्यांनी त्याला पकडून मंदिराच्या खांबाला बांधले. ग्रामस्थांनी आरोपीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2022 05:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).