SBI: एसबीआयकडून ग्राहकांना सावधानतेचा इशारा; केव्हायसीच्या नावाने फसवणूक होत असल्याची माहिती समोर
याचबरोबर फेसबूक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर फसवणूक झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचबरोबर फेसबूक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर फसवणूक झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यातच देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (State Bank Of India) आपल्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगारांनी आता केव्हायसीच्या (KYC) बहाण्याने ग्राहकांची लूट करण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे केव्हायसीच्या नावाखाली आलेल्या बनावट फोन कॉलला बळी पडू नका, असे आवाहन एसबीआयने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात विविध पद्धतीने सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक केल्याची अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, सायबर गुन्हेगार मॅसेज किंवा कॉलच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करत आहेत. सध्या त्यांनी केव्हायसी पद्धतीचा वापर करून नागरिकांची लूट सुरु केली आहे. बॅंक केव्हायसी करण्यासाठी आपल्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करते. याचाच गैरफायदा आता सायबर गुन्हेगार घेऊ लागले आहेत. सायबर गुन्हेगार केव्हायसी पद्धतीने ग्राहकांची सत्य माहिती पडताळणी करण्याच्या नावाने काही लोक तुमची फसवणूक करत आहेत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. तसेच कोणत्याही कॉल किंवा मेसेजला बळी पडू नका, असे आवाहन एसबीआय बॅंकेने त्यांच्या ग्राहकांना केले आहे. हे देखील वाचा- UAN क्रमांक ॲक्टिव्ह करण्यासाठी 'या' सोप्प्या स्टेप्स फॉलो करा
ट्वीट-
सायबर गुन्हेगार क्राईमबाबत गृहमंत्रालयाने ट्विटरच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा दिला आहे. मोबाईलवर आलेल्या कोणत्याही मॅसेजला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. सायबर गुन्हेगार लोकांना मेसेज करुन अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडून अनेक लोक यामध्ये बळी ठरले आहेत. अनेकांना यामुळे लुबाडले गेले आहे. सायबर क्राईमच्या अशा विविध घटना समोर आल्यानंतर केंद्र सरकारने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.