Sangeet Natak Akademi Amrit Awards 2023: आज 84 कलाकारांना देण्यात येणार संगीत नाटक अकादमीचा अमृत पुरस्कार, उपराष्ट्रपती करणार दिग्गज कलाकारांचा सन्मान
संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती, परंपरा आणि वारसा जपणाऱ्या या कलाकारांना कधीही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही. या पुरस्कारासाठी सुमारे 500 अर्ज आले होते. त्यातून अकादमीच्या जनरल कौन्सिलने विविध बाबींच्या आधारे 84 कलाकारांची निवड केली.
Sangeet Natak Akademi Amrit Awards 2023: आझादी का अमृत महोत्सवांतर्गत (Azadi Ka Amrit Mahotsav) 75 वर्षांवरील 84 कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने (Sangeet Natak Akademi Amrit Award) गौरविण्यात येणार आहे. या दिग्गज कलाकारांना पहिल्यांदाच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. उपाध्यक्ष जगदीप धनखर (Vice President Jagdeep Dhankhar) आज 70 पुरुष आणि 14 महिला उत्कृष्ट कलाकारांचा सन्मान करणार आहेत. त्यापैकी सर्वात जुने मणिपूरचे 101 वर्षांचे युम्नाम जत्रा सिंग आहेत. पुरस्कार यादीत 90 वर्षांवरील 13 आणि 80 वर्षांवरील 38 कलाकारांचा समावेश आहे. गौरी कुप्पुस्वामी आणि महाभाष्याम चित्तरंजन या दोन महिला कलाकारांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात येणार आहे.
संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती, परंपरा आणि वारसा जपणाऱ्या या कलाकारांना कधीही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही. या पुरस्कारासाठी सुमारे 500 अर्ज आले होते. त्यातून अकादमीच्या जनरल कौन्सिलने विविध बाबींच्या आधारे 84 कलाकारांची निवड केली. या ज्येष्ठ कलाकारांना ताम्रपट, अंगवस्त्रम याशिवाय राष्ट्रीय पुरस्काराच्या स्वरुपात एक लाख रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे. याशिवाय आजारी पडल्यास दीड लाख रुपयांची मदतही दिली जाणार आहे. (हेही वाचा - Most Popular Global Leader: पंतप्रधान Narendra Modi ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते; मिळाले 76% अप्रूव्हल रेटिंग)
प्रताप सहगल यांना दिल्ली राज्यांतर्गत नाट्य लेखनातील अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 3 मार्च 1948 रोजी प्रयागराज येथे जन्मलेल्या कुमकुम लाल यांना दिल्ली राज्यांतर्गत ओडिसी नृत्यासाठी अमृत पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय बनारस हिंदू विद्यापीठाच्या गायन संगीत विभागाचे माजी अध्यक्ष चित्तरंजन ज्योतिषी यांना हिंदुस्थानी गायन संगीत अंतर्गत सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय कथ्थकसाठी पूर्णिमा पांडे, नाट्यलेखनासाठी कानपूरच्या सुशील कुमार सिंग, कथ्थक नृत्यासाठी लखनऊमध्ये जन्मलेल्या पद्मा शर्मा आणि आझमगडच्या हरिपूर गावात जन्मलेल्या दीनानाथ मिश्रा यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
तथापी, पंजाबमधील रोपर येथे जन्मलेले प्रसिद्ध तबलावादक सुशील कुमार जैन यांना हिंदुस्थानी वाद्य संगीत क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून मुकेरियन येथे जन्मलेले भीमसेन शर्मा यांना हिंदुस्थानी संगीत (गायन आणि वादन) क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. श्रीनगरच्या बड्यार बाला गावात जन्मलेल्या हरी कृष्ण लांगू यांना संबंधित नाट्य कला आणि लडाखच्या छिरिंग स्टॅनजिन यांना लडाखी संगीतासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)