Woman Tourist Falls To Death In Manali: पॅराग्लायडिंग करताना सेफ्टी बेल्ट उघडला, 250 मीटर उंचीवरून पडून महिलेचा मृत्यू; पायलटला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच महिलेचा हार्नेस मध्यभागी तुटला. खबरदारीचा उपाय म्हणून डोभी येथे सर्व पॅराग्लायडिंगवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

Paragliding| Representative Image (Photo Credits: Pixabay)

Woman Tourist Falls To Death In Manali: हिमाचल प्रदेशातील कुल्लू (Kullu) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात, तेलंगणातील महिला पॅराग्लायडिंग (Paragliding) करताना सुमारे 250 मीटर उंचीवरून खाली पडली. ज्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. पॅराग्लायडिंग करताना बेल्ट तुटल्याने घराच्या छतावरून पडून महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, आता डोभी पॅराग्लायडिंग साइटवर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली असून पायलटला अटक करण्यात आली आहे.

पॅराग्लायडर पायलटला अटक - 

पोलिसांनी या मृत्यूचा तपास सुरू केला असून पॅराग्लायडर पायलटला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच महिलेचा हार्नेस मध्यभागी तुटला. खबरदारीचा उपाय म्हणून डोभी येथे सर्व पॅराग्लायडिंगवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. (हेही वाचा -Himachal Pradesh: कुल्लूच्या डोभी येथे पॅराग्लायडिंग अपघातात पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू)

दरम्यान, पॅराग्लायडिंग करताना मृत्यू झालेल्या महिला पर्यटकाचे नाव नव्या (वय, 26) झहीराबाद जिल्हा, सांगा रेडी, तेलंगणा अशी झाली आहे. पॅराग्लायडिंग अपघातप्रकरणी पोलिसांनी पायलटला अटक केली आहे. डोभी हे हिमाचल प्रदेशातील कुल्लूमधील सर्वात लोकप्रिय पॅराग्लायडिंग साइट्सपैकी एक आहे. परंतु, दुर्दैवाने, गेल्या काही वर्षांत या ठिकाणाहून अनेक अपघातांची नोंद झाली आहे. अपघातांची संख्या वाढल्यामुळे, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने जानेवारी 2022 मध्ये सर्व पॅराग्लायडिंगवर बंदी घातली होती. (हेही वाचा - Sikkim: पॅराग्लायडिंग करताना तोल जाऊन नदीत पडल्याने गाईडसह पर्यटकाचा मृत्यू)

याआधीही 2022 मध्ये कुल्लूच्या डोभी परिसरात पॅराग्लायडिंगला गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकाचा पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात सेफ्टी हार्नेसही तुटला होता. या घटनेत पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला, मात्र पायलट पॅराग्लायडर सुखरूप बचावला. 2022 मध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणातील पीडित महिला सातारा जिल्ह्यातील शिरवळ गावची रहिवासी होती.