'बलात्कार, नक्षलवाद, दहशतवाद, ही नेहरू घराण्याची देण' साध्वी प्राची यांचे धक्कादायक विधान

यातच आता त्यांच्या नव्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बलात्कार, नक्षलवाद, दहशतवाद ही नेहरु घरण्याची देण आहे, अस विधान करुन साध्वी प्राची यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची नेहमी (Sadhvi Prachi) त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे नेहमी चर्चेत असतात. यातच आता त्यांच्या नव्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बलात्कार, नक्षलवाद, दहशतवाद ही नेहरु घरण्याची देण आहे, अस विधान करुन साध्वी प्राची यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टिका केली आहे. हैदराबाद आणि उन्नाव बलात्कारानंतर काँग्रेस नेते राहुल गांधीनी भारत हा जगात रेप कॅपिटल म्हणून ओळखला जात असल्याची वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यातच साध्वी प्राची यांनी हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी पोलिसांचे कौतूक करत राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका केली आहे.

हैदराबाद, उन्नाव बलात्कार आणि हत्या प्रकरणी संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया येत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत देश हा रेप कॅपिटल म्हणून ओळखला जात असल्याचे वक्तव्य केले होते. यातच हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांचा मेरठ येथील एका कार्यक्रमात तोल सुटला. बलात्कार, नक्षलवाद आणि दहशतवाद ही नेहरु घरण्याचीच देण आहे, असे त्यावेळी साध्वी प्राची म्हणाल्या आहेत. एवढेच नव्हेतर राहुल गांधी यांच्यासह त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला आहे. सत्तेत असताना बलात्काऱ्यांना वाचवतात आणि सत्ता गेल्यानंतर बलात्काऱ्यांना शिक्षा व्हावी, म्हणून अंदोलन करतात, असे साध्वी प्राची म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- बलात्काराचा खटला मागे न घेतल्याने मुझफ्फरनगरमध्ये आरोपींनी पीडितेवर केला अॅसिड हल्ला

दरम्यान, साध्वी प्राची यांनी हैदराबादमध्ये पोलिसांनी बलात्काऱ्यांच्या केलेल्या एन्काउंटरचे समर्थन केले. हैदराबाद पोलिसांकडून धडा घेऊन उत्तर प्रदेश पोलिसांनीही उन्नावप्रकरणी न्याय केला पाहिजे. ज्या ठिकाणी पीडितेला नराधमांनी जिवंत जाळले. त्याच ठिकाणी या आरोपींनाही जाळायला हवे, असा संताप व्यक्त करतानाच उन्नाव कांडातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्याची मागणीही त्यांनी केली आहे.