कोरोना विरोधातील लढ्यासाठी सदगुरूंनी केला ‘भैरव’ पेंटिंगचा लिलाव; कोविड मदत निधीसाठी 9 कोटींची मदत
कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी देशातील अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना विरोधातील लढ्यासाठी 'इशा फाऊंडेशन'चे (Isha Foundation) प्रमुख सदगुरु (Sadhguru) यांनी प्रसिद्ध ‘भैरव’ या पेंटिंगचा 5.1 कोटी रुपयांना लिलाव केला आहे. या निधीसह सदगुरूंनी कोविड मदत निधीसाठी (COVID 19 Relief Fund) एकूण 9 कोटींची मदत केली आहे.
देशात कोरोना बाधित रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी देशातील अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना विरोधातील लढ्यासाठी 'इशा फाऊंडेशन'चे (Isha Foundation) प्रमुख सदगुरु (Sadhguru) यांनी प्रसिद्ध ‘भैरव’ या पेंटिंगचा 5.1 कोटी रुपयांना लिलाव केला आहे. या निधीसह सदगुरूंनी कोविड मदत निधीसाठी (COVID 19 Relief Fund) एकूण 9 कोटींची मदत केली आहे.
दरम्यान, सदगुरु यांनी कोरोना विरोधातील लढ्यासाठी निधी उभारण्यासाठी 'भैरव' या पेंटिंगचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, त्यांनी या पेटिंगची ऑनलाईन बोली लावली होती. आज या पेंटिंगची 5 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. या पैशात आणखी भर घालून सदगुरू यांनी तामिळनाडूमधील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे. (हेही वाचा - कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी मानसिक आरोग्याची काळजी घेण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या 'या' महत्त्वाच्या Guidelines)
भैरव पेंटिंग -
भैरव हे सदगुरू यांच्या आवडत्या बैलाचं पेंटिंग आहे. त्यांनी नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करुन हे पेंटिंग तयार केलं आहे. यात शेण, कोळसा, हळद, चुनखडी यांचा उपयोग करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात या बैलाचा मृत्यू झाला होता. हा बैल आजारी होता. परंतु, वेळेवर डॉक्टर उपलब्ध होऊ न शकल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यांच्या आठवणीत सदगुरू यांनी हे पेंटिंग बनवलं होतं. या पेंटिंगचा आज लिलाव करण्यात आला असून यापासून मिळालेल्या पैशाचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी देण्यात करण्यात येणार आहे.