Ukraine Russia Crisis: रशिया युक्रेनमधील युद्धामुळे भारतीय शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 2000 अंकांपेक्षा अधिक, निफ्टी सुमारे 600 अंकांनी घसरला
बाजार उघडण्यापूर्वी सेन्सेक्स आणि निफ्टी प्री-ओपनिंगमध्ये मोठी घसरण दर्शवत आहेत. निफ्टीमध्ये 514 अंकांच्या घसरणीसह, 16548 अंकांची किंवा 3 टक्क्यांची मोठी घसरण दिसून येत आहे.
Ukraine Russia Crisis: युक्रेन-रशिया यांच्यात युद्ध (Ukraine-Russia War) सुरू झाल्याच्या बातम्यांमुळे आज देशांतर्गत शेअर बाजारात (Stock Market) खळबळ उडाली असून बाजारात चौफेर विक्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्री-ओपनिंगमध्येच बाजार 3 टक्क्यांहून अधिक तुटला आहे. ICICI बँकेचे (ICICI Bank) शेअर्स उघडताच 4 टक्क्यांनी खाली आले आहेत. सर्व क्षेत्रीय निर्देशांक (Sectorial Index) घसरणीच्या लाल चिन्हात बुडलेले आहेत.
देशांतर्गत शेअर बाजार आज अशा ओपनिंगसह उघडला आहे ज्यामध्ये सर्वत्र लाल चिन्ह दिसत आहे. सेन्सेक्स 1813 अंकांच्या जबरदस्त घसरणीसह 55,418 वर उघडला आहे. निफ्टी 514 अंकांच्या घसरणीसह 16,548 वर उघडला आहे. (वाचा - Ukraine Russia Crisis: रशिया-युक्रेन मध्ये युद्ध अटळ; Russian President Vladimir Putin कडून लष्करी कारवाई करण्याची घोषणा)
शेअर बाजारातील सर्वांगीण विक्री आणि घबराटीचे वातावरण यामुळे लाल चिन्ह झाकले आहे आणि निफ्टीच्या 50 पैकी 50 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. बँक निफ्टी 1000 अंकांची घसरण करत 2.69 टक्क्यांच्या घसरणीसह 36422 च्या पातळीवर व्यवहार करत होता. बँक निफ्टीचे सर्व 12 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.
सकाळी 9:45 वाजता बाजाराची स्थिती -
सकाळी 9:45 वाजता, सेन्सेक्स 2,020.90 अंकांनी किंवा 3.53 टक्क्यांनी घसरून 55,211.16 वर व्यवहार करत आहे. याशिवाय निफ्टी 594.40 अंक किंवा 3.48 टक्क्यांच्या घसरणीनंतर 16,468 वर व्यवहार करताना दिसत आहे.
दरम्यान, टाटा मोटर्स 5.23 टक्के आणि टेक महिंद्रा 4.44 टक्क्यांनी घसरले आहेत. अदानी पोर्ट्स 4.32 टक्के आणि JSW स्टील 4 टक्क्यांनी घसरले आहे. इंडसइंड बँक 3.86 टक्क्यांच्या कमजोरीसह व्यवहार करत आहे.
सेक्टोरियल इंडेक्सची स्थिती -
सेक्टोरियल इंडेक्सवर नजर टाकली तर सर्व समभाग खाली आले आहेत आणि रेड झोनमध्ये दिसत आहेत. मीडिया शेअर्समध्ये 3.25 टक्क्यांची जबरदस्त घसरण झाली असून निफ्टी ऑटो इंडेक्स 2.59 टक्क्यांच्या मजबूत घसरणीसह व्यवहार करत आहे. मेटल इंडेक्सही 2.5 टक्क्यांनी घसरला आहे. आयटी निर्देशांक 2.80 टक्क्यांनी घसरला आहे. तेल आणि वायू, एफएमसीजी, फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या जोरदार घसरणीने बाजार हादरला आहे.
दरम्यान, बाजार उघडण्यापूर्वी सेन्सेक्स आणि निफ्टी प्री-ओपनिंगमध्ये मोठी घसरण दर्शवत आहेत. निफ्टीमध्ये 514 अंकांच्या घसरणीसह, 16548 अंकांची किंवा 3 टक्क्यांची मोठी घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये 1813.61 अंकांच्या म्हणजेच 55,418 च्या पातळीवर व्यवसाय होताना दिसत होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)