Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम, भारता खाद्यतेल महागले, प्रति किलो 20 रुपयांनी दरवाढ

खाद्यतेल दरात प्रति किलो थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 20 रुपयांची वाढ झाली आहे. खाद्य तेलात झालेल्या दरवाढीमुळे महागाई (Inflation in India) आणखीच वाढली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे.

Edible oil | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) पेट्रोल, डिझेल यांसारखे इंधनच काय खाद्यतेल (Edible Oil) दराचाही भडका उढाला आहे. खाद्यतेल दरात प्रति किलो थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 20 रुपयांची वाढ झाली आहे. खाद्य तेलात झालेल्या दरवाढीमुळे महागाई (Inflation in India) आणखीच वाढली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे. सामान्य ग्राहकांना खाद्य तेल माफ दरात उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, त्याच म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही. आगोदरच महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त होता. त्यात महागाई (Inflation) आणखी आक्राळविक्राल रुप धारण करत आहे.

भारतात वापरल्या जाणाऱ्या खाद्य तेलामध्ये सूर्यफूल तेल सर्वाधिक लोकप्रीय आहे. भारता सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सूर्यफूल तेलाची आवक रशिया आणि युक्रेन येथून केली जाते. तर, पामतेल इंडोनेशिया, मलेशिया आदी देशातून आयात होते. सोयाबीन तेलाबाबत सांगायचे तर ते ब्राझील, अर्जेटिना देशातून येते. रशिया-युक्रेन युद्धामुंळे सर्वच देशांच्या आयात निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. बंदरे बंद असल्याने विविध देशांनी आपल्या निर्यात मालाबाबत हात आखडते घेतले आहेत. भारताला 11 लाख टन खाद्य तेलाची आवश्यकता असते. त्यापैकी केवळ सहा ते सात टन खाद्यतेल उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे उर्वरीत तेलाबाबत भारतासमोर मोठाच प्रश्न आहे.

भारताचे देशांतर्ग सोयाबीन उत्पादनही घटले आहे. खाद्य तेलाचा दुसरा स्त्रोत म्हणजे मोहरी. पण मोहरीही अद्याप बाजारात आली नाही. ती जरी बाजारात आली तरी मोहरीचे तेल प्रामुख्याने बिहार आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांमध्येच वापरले जाते. इतर राज्यांमध्ये ते वापरले जात नाही. त्यामुळे दक्षिण भारत, महाराष्ट्रासह इतर राज्यांना आवश्यक असलेले खाद्यतेल पुरवताना सरकारची दमछाक होणार आहे. त्यातच केंद्र सरकारचा सर्वात कमी असलेला वस्तू सेवा कर हा 5% आहे. त्यात वाढ करण्याचा सरकार विचार करत असल्याचे वृत्त आहे. तसे घडल्यास परिस्थिती आणखीच बिकट होऊ शकते.