Hydrabad Bike Blast: रॉयल एनफिल्ड बाईकचा भीषण स्फोट, 10 जण जखमी, हैद्राबाद येथील घटना (Watch Video)

हैद्राबादमध्ये दुचाकीचा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

hydrabad Blast PC TWITTER

Hydrabad Bike Blast: हैद्राबादमध्ये दुचाकीचा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना रविवारी दुपारी  मोगलपुरा येथील बीबी बाजार रोड येथे घडली. धक्कादायक म्हणजे दुचाकीचा स्फोट होऊन सुमारे दहा जण गंभीर जखमी झाले. ही भयानक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा-  जबलपूर महामार्गावर इंजिन बिघडल्यामुळे ट्रकला आग, कोणतीही जीवितहानी नाही )

मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल एनफिल्ड मोटारसायकलला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न  काही लोक करत आहे. बाइकचा स्फोट झाल्यानंतर काही जण भाजून जखमी झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. रस्त्याच्या मधोमध दुचाकीचा स्फोट झाल्याने एका पोलीस हवालदारासह दहा जण गंभीर जखमी झाले. एक व्यक्ती रॉयल एनफिल्ड बाईक चालवक होता. बाईक बीबी बाजारजवळ येताच, अचानक आग लागली. दुचाकीस्वाराने दुचाकीवरून उडी मारून स्वत:ला वाचवले. मात्र, परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.

 लोक आगीवर नियंत्रण मिळवत असताना, अचानक बाईकचा स्फोट झाला. या स्फोटात अनेक जण गंभीर जखमी झाले. स्फोट इतका भयंकर होता की, यात दहाहून अधिक जण जखमी झाले. या घटनेची माहिती पोलिस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी बचाव कार्य सुरु झाल्यानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.