जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किमती वाढल्याने पेट्रोल, डिझेलचे दर भडकले!

त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सोमवारी देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली. त्यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटर 16 ते 17 तसेच डिझेल 18 ते 19 पैशांनी महागले आहे. या नव्या भाववाढीमुळे मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 80.69 तर डिझेल 71.12 रुपयांनी महागले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किमती वाढल्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला छळ लागणार आहे. सोमवारी देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली. त्यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटर 16 ते 17 तसेच डिझेल 18 ते 19 पैशांनी महागले आहे. या नव्या भाववाढीमुळे मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 80.69 तर डिझेल 71.12 रुपयांनी महागले आहे.

या दरवाढीमुळे नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी गाडीने बाहेर जाणाऱ्यांना दरवाढीचा फटका बसणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 65 डॉलर प्रति बॅरलने वाढल्या आहेत. त्यामुळे तेल आयातीच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. परिणामी मुंबईत पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 16 पैशांची वाढ झाली आहे. तसेच डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 19 पैशांची वाढ झाली आहे. (हेही वाचा - रेल्वे भाडेवाढी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही; रेल्वे मंडळाचा खुलासा)

देशाअंतर्गत झालेल्या इंधनाच्या दरवाढीमुळे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 75.04 रुपये तसेच डिझेलचे दर प्रति लिटर 67.78 रुपये आहेत. कोलकात्यामध्ये पेट्रोलचे प्रति लिटर दर 77.70 रुपये तर डिझेलचे दर 70.20 रुपये प्रति लिटर आहेत.