Mumbai: तरूणीला कपडे काढायला सांगून व्हिडिओ केला रेकॉर्ड, व्हायरल करण्याची देऊन उकळले हजारो रुपये; आरोपी अटकेत

याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यातही लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Obscene Video

कोरोना महामारीपासून सोशल मीडियाच्या (Social Media) वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यातही लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच मुंबईच्या (Mumbai) मालाड (Malad) येथील एका अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ (Obscene Video) रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून हजारो रुपये लुबडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून त्याच्याविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तिची इन्स्टाग्रामवर एका संजय अहोळ नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली आहे. त्यानंतर त्यांच्यातील मैत्री वाढली आणि ते दररोज एकमेकांशी गप्पा मारायचे. तसेच ते एकमेकांना व्हिडिओ कॉलदेखील करीत होते. मात्र, एका दिवशी व्हिडिओ कॉलदरम्यान संजयने पीडिताला व्हिडिओ कॉलदरम्यान कपडे काढायला सांगितले. परंतु, पीडिताने नकार दिला. यामुळे नाराज झाल्याचे नाटक करीत संजयने व्हिडिओ कॉलदरम्यान तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली. मुलीने घाबरून सहमती दर्शवली आणि कपडे काढायला सुरुवात केली. त्यावेळी संजयने स्क्रीन रेकॉर्डींग अॅपचा वापर करीत तिचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला लुबडण्यास सुरुवात केली. संजयने अशापद्धतीने तिच्याकडून आतापर्यंत तब्बल 58 हजार लुबाडल्याचे माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांने दिली आहे. हे देखील वाचा- Bihar Grampanchayat Election 2021: बिहारमध्ये ग्राम पंचायतीच्या माजी प्रमुखाची केली हत्या, मुस्रीघरारी परिसरात अज्ञातांनी झाडली गोळी

महत्वाचे म्हणजे, पाडिताने बदनामीच्या भितीने संजयला पैसे देण्यासाठी घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, घरातील दागिने, पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू गायब होत असल्याचे पीडिताच्या आईच्या लक्षात आले. त्यानंतर पीडिताच्या आईने तिच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी पीडिताने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर दोघींनी कुरार पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाहनचालक असून तो मूळचा उस्मानाबाद येथील आहे. त्याला पोलिसांच्या पथकाने मुंबईला आणले आहे. तसेच पोलिसांनी पोक्सो काद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.