Shaktikanta Das On Inflation: महागाई नियंत्रित करण्यावर RBI चे पूर्ण लक्ष; शक्तीकांत दास

गव्हर्नर (शक्तिकांता दास) म्हणाले की, एकूणच महागाई मात्र अन्नधान्याच्या किमतीच्या धक्क्याबाबत संवेदनशील आहे. त्याच वेळी, जानेवारी 2023 मध्ये उच्च पातळी गाठल्यानंतर कोर महागाई 1.70 टक्क्यांनी खाली आली आहे.

Shaktikanta Das | (Photo Credit - Twitter/ANI)

Shaktikanta Das On Inflation: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महागाईबाबत (Inflation) अत्यंत सावध आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी गुरुवारी सांगितले की, आर्थिक विकासाला समर्थन देणे आणि चलनवाढ नियंत्रणात आणणे हे आरबीआयचे आर्थिक धोरण (MPC) आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ दोन टक्क्यांच्या तफावतीने चार टक्क्यांवर ठेवण्याची जबाबदारी सरकारने केंद्रीय बँकेला दिली आहे. दास यांनी टोकियो येथील एका सेमिनारमध्ये आरबीआयच्या आर्थिक तंत्रज्ञानाचा वातावरणाचा संदर्भ देताना सांगितले की ते ग्राहक केंद्रित आहे.

शक्तिकांत दास पुढे बोलताना म्हणाले की, चलनविषयक धोरण समितीने (MPC) त्यांच्या ऑक्टोबरच्या बैठकीत 2023-24 साठी किरकोळ चलनवाढीचा दर 5.4 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, जो 2022-23 च्या 6.7 टक्क्यांपेक्षा कमी आहे. ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई सप्टेंबरमध्ये तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. (हेही वाचा - RBI Expanding India's UPI Reach: यूपीआय विस्तारासाठी आरबीआय प्रयत्नशील, मॉरिशस आणि इंडोनेशियाशी चर्चा सुरू)

ऑक्टोबर महिन्याची महागाईची आकडेवारी 13 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. गव्हर्नर (शक्तिकांता दास) म्हणाले की, एकूणच महागाई मात्र अन्नधान्याच्या किमतीच्या धक्क्याबाबत संवेदनशील आहे. त्याच वेळी, जानेवारी 2023 मध्ये उच्च पातळी गाठल्यानंतर कोर महागाई 1.70 टक्क्यांनी खाली आली आहे.

शक्तिकांत दास यांनी पुढे नमूद करताना म्हटलं की, आम्ही किमती कमी करण्याच्या दिशेने काम करत आहोत. चलनविषयक धोरण समितीने (MPC) ऑक्टोबरमधील द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात प्रमुख धोरण दर रेपो 6.5 टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवला. हे सलग चौथ्यांदा घडले, जेव्हा रेपो दरात कोणताही बदल केला गेला नाही. एमपीसीची पुढील बैठक डिसेंबरच्या सुरुवातीला होणार आहे.

दरम्यान यावेळी दास UPI संदर्भात वक्तव्य करताना म्हणाले की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने भारतातील फिनटेक क्रांतीमध्ये अभूतपूर्व भूमिका बजावली आहे. त्याची यशोगाथा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय मॉडेल बनली आहे. याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेच्या कामगिरीबाबत शक्तीकांत दास म्हणाले की, अलीकडच्या काळात चढउताराच्या परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था सुरळीतपणे प्रगती करत असून ही समाधानाची बाब आहे. धोरणात्मक उपाय विकासाला चालना आणि बळ देत आहेत. महागाईही नियंत्रणात येत आहे.