Rat Found Alive in Chuteny: हैदराबादच्या JNTUH वसतिगृहाचा मोठा निष्काळजीपणा! मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या चटणीत पडला जिवंत उंदीर, पाहा व्हिडीओ

हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या (JNTUH) वसतिगृहाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला वसतिगृहाच्या मेसमध्ये जेवण देण्यात आले. विद्यार्थ्याला जेवणात चटणीही देण्यात आली. पण एक जिवंत उंदीर चटणीत तरंगताना दिसला. यानंतर विद्यार्थ्याला धक्काच बसला. जिवंत उंदीर चटणीत पडला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

Rat Found Alive in Chuteny:  हैदराबादच्या JNTUH वसतिगृहाचा मोठा निष्काळजीपणा! मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या चटणीत पडला जिवंत उंदीर, पाहा व्हिडीओ
Rat Found Alive in Chuteny

Rat Found Alive in Chuteny: हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या (JNTUH) वसतिगृहाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला वसतिगृहाच्या मेसमध्ये जेवण देण्यात आले. विद्यार्थ्याला जेवणात चटणीही देण्यात आली. पण एक जिवंत उंदीर चटणीत तरंगताना दिसला. यानंतर विद्यार्थ्याला धक्काच बसला. जिवंत उंदीर चटणीत पडला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये, जिवंत उंदीर बाहेर पडण्यासाठी चटणीने भरलेल्या भांड्यात उडी मारत असल्याचे दिसून येते. 8 जुलै रोजी वसतिगृहाच्या मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या चटणीमध्ये हा उंदीर आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. वसतिगृहाच्या जेवणाच्या दर्जाबाबत होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जेव्हा चटणीमध्ये उंदीर आढळतो:

वसतिगृहाच्या या निष्काळजीपणाचा नेटिझन्सही खरपूस समाचार घेत आहेत. वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, गरीब उंदरासाठी हे स्विमिंग पूलसारखे आहे. मात्र, वसतिगृहाच्या या निष्काळजीपणाबाबत कॉलेज व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र या निष्काळजीपणाबद्दल वसतिगृह मालकावर कारवाई करावी, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कारण हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडीत विषय आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2024 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).