Haryana Rape: अश्लील व्हिडिओ बनवून दोन वर्ष तरूणीवर बलात्कार; 2 जणांना अटक

ही घटना हरियाणा (Haryana) येथील फतेहाबाद येथे घडली आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

अश्लील व्हिडिओ बनवून दोन वर्ष तरूणीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना हरियाणा (Haryana) येथील फतेहाबाद येथे घडली आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. पीडितांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, याप्रकरणातील दोन्ही आरोपींनी दोन वर्षापूर्वी तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी आरोपीने तिचा व्हिडिओ तयार केला होता. याच व्हिडिओची धमकी देत आरोपींनी दोन वर्ष तिच्यावर बलात्कार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरमीत सिंह आणि नाजिर सिंह असे आरोपींचे नाव आहेत. दोघांनी गेल्या दोन वर्षापूर्वी पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्यावेळी त्यांनी पीडिताचा अश्लील व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दोन्ही आरोपी तिचा बलात्कार करत होते, अशी महिती पीडिताने पोलिसांना दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुरमीत आणि नाजिर यांच्याविरोधात भारतीय दंड विधायक कलम 376(2) 450, 384 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. तसेच याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पीडिताने केली आहे. हे देखील वाचा- Wife Kills Husband: धक्कादायक! अनैतिक संबंधातून पतीची हत्या; पत्नीसह तिच्या प्रियकरालाही अटक

याआधी झारखंड येथे दोन तरूणांनी अल्पवयीन मुलीचा बलात्कार तिच्या सामूहिक बलात्कार केला होता. त्यावेळी त्यांनीदेखील पीडित तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पाडित मुलीला घरात एकट पाहून आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला होता.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तसेच महिला अत्याचार प्रकरणात दोषी ठरणाऱ्या आरोपींना तातडीने शिक्षा देण्यात यावी, यासाठी आंध्र प्रदेश प्रमाणे संपूर्ण भारतात दिशा कायदा संमत केला जावा, अशा मागणी जोर धरत आहे.