Nirbhaya Case:'पोक्सोअंतर्गत दोषींना दया नकोच'- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
हैदराबाद येथे एका महिलेचा बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी (Hyderabad Rape and Murder Case) पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केल्यानंतर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांची प्रतिक्रिया आली आहे.
हैदराबाद येथे एका महिलेचा बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी (Hyderabad Rape and Murder Case) पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केल्यानंतर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांची प्रतिक्रिया आली आहे. भारतात दररोज अनेक महिलांना अत्याचार सहन करावा लागत आहे. महत्वाचे म्हणजे, महिलेवर होणाऱ्या अत्याचारावर कायमचा आळा घालण्यात यावा यासाठी, सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याचत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 16 डिसेंबर 2016 रोजी निर्भया बलात्कार प्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपीला मृतदंडची सुनावाई केली होती. दरम्यान, चार आरोपीपैंकी एकाची सुटका करण्यात यावी, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी मागणी गृहमंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. महिलांची सुरक्षा ही एक गंभीर समस्या आहे. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हेगारांना दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असू नये, असे वक्तव्य रामनाथ कोविंद यांनी केले आहे.
हैदराबाद येथील एका महिला डॉक्टरचा बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यानंतर निर्भया बलात्कार प्रकरणाने पेट घेतला आहे. निर्भया बलात्कारमध्ये चार आरोपींचा समावेश असून त्यापैकी एकाला दया देण्यात यावी, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळून लावण्यासाठी दिल्ली सरकारने उपराज्यपालांकडे पत्र दिले होते. त्यानंतर गृहमंत्रालायाकडून राष्ट्रपती यांच्याकडे गेले. यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले आहेत की, 'महिलांची सुरक्षा ही एक गंभीर समस्या आहे. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हेगारांना दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असू नये. संसदेत दया याचिकांचा आढावा घ्यावा, असे राष्ट्रपती म्हणाले आहेत.
एएनआयचे ट्वीट-
सध्या बलात्कार प्रकरण अधिकच वाढले असून यावर आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. हैदरबाद येथे ३० नोव्हेंबर रोजी एका महिला डॉक्टरचा बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेची माहिती होताच, संपूर्ण देशात खळबळ एकच खळबळ उडाली होती. तसेच आरोपीला अटक झाल्यानंतर त्यांच्या कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही अनेकांनी केली होती. आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी रात्री पोलिसांच्या जाळ्यातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करावा लागला. यात सर्व आरोपी ठार झाले. यावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.