Uttar Pradesh: संतापजनक! सामूहिक बलात्काराची तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितेवर पोलीस ठाण्यात बलात्कार

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात झाली आहे

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असताना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) शाहजहांपूर (Shahjahanpur) येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. दरम्यान, सामूहिक बलात्काराची तक्रारी देण्यासाठी गेलेल्या पीडितेवर एका पोलिसानेच बलाकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला मदनपुर येथे जात असतना पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मात्र, या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली असता एका उपनिरीक्षकाने तिला पोलिस स्टेशनच्या आतल्या एका बॅरेकमध्ये नेऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही जलालाबाद येथील रहिवाशी आहे. ती 30 नोव्हेंबर रोजी मदनपुर येथे ई-रिक्षा जात होती. मात्र, रस्त्यातच तिची ई-रिक्षा बंद पडली. यामुळे पीडिताने पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी कारमधून आलेल्या पाच जणांनी तिला जवळच्या शेतात नेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Andhra Pradesh: तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून मुलीने केले किटकनाशक प्राशन; उपचारादरम्यान मृत्यू

ट्विट-

पोलीस निरीक्षक ब्रह्मपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या पीडित महिलेल्या विनोद कुमार यांनी आपल्या रुममध्ये घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आहे, असे पीडिताने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. त्यानुसार पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच याप्रकरणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.