90-Hour Work Week Debate: ‘वरीष्ठांपासून अंमलबजावणी सुरुवात करू द्या’; SN Subrahmanyam यांच्या विधानावर Rajiv Bajaj यांची प्रतिक्रीया, तासांच्या गुणवत्तेपेक्षा कामाची गुणवत्ता महत्त्वाची (Watch Video)

कंपनीच्या नेतृत्वाने प्रभावीपणाचे मूल्यांकन करण्यासाठी प्रथम ते वापरून पहावे असा सल्ला राजीव बजाज यांनी दिला. कामाचे तास मोजण्याऐवजी त्या तासांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यावर भर द्या असे म्हटले आहे.

Photo Credit- X

90-Hour Work Week Debate: बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी एल अँड टी चे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम (L&T Chairman SN Subrahmanyan)यांच्या 90 तासांच्या कामाच्या आठवड्याच्या विधानावर आपले मत मांडले. सीएनबीसी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी निष्पक्षता आणि जबाबदारीची गरज यावर भर दिला. आणि अशा पद्धतीचे काम प्रथम नेतृत्व पातळीवर लागू केल्या पाहिजेत आणि नंतर त्या संपूर्ण संस्थेत लागू केल्या पाहिजेत असा सल्ला दिला. (L&T chairman SN Subrahmanyan:'आठवड्यातून 90 तास काम करा', एल अँड टीचे एस एन सुब्रमण्यम नारायणमूर्ती यांच्याही एक पाऊल पुढे)

‘वरीष्ठांपासून अंमलबजावणी सुरुवात करू द्या’

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by CNBC-TV18 (@cnbctv18india)

कामगारांची प्रभावीतता निश्चित करण्यासाठी हे लागू करण्याची आवश्यकता नाही. "जेव्हा सर्व मोठ्या चर्चा वरच्या पातळीवर होतात. तर,अंमलबजावणी खालून सुरू का? होते तेव्हा ही खूप मोठी समस्या असते, जी अन्यायकारक आहे." वृत्तांनुसार, राजीव बजाज यांनी कामाचे तास मोजण्याऐवजी त्या तासांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्यावर भर दिला. (SN Subrahmanyan यांच्या विधानावर Deepika Padukoneची परखड टीका; म्हणाली...‘यांनी तर परिस्थिती आणखीणच वाईट केली’;)

याआधी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम यांच्या या खळबळजनक विधानावर थेट सोशल मिडीयाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत एसएन सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांना रविवारीही काम करण्याचे आवाहन केले होते. त्याशिवाय, आठवड्यातून 90 तास काम करण्याबद्दलही त्यांनी विधान केले होते. अभिनेत्रीने त्यांच्या या वक्तव्याला नाराजी दर्शवली होती.

दिपीकाने इंस्टाग्राम स्टोरीजवर पत्रकार फेय डिसोझा यांचा अहवाल शेअर केला, "एवढ्या वरिष्ठ पदांवर असलेले लोक अशी विधाने करतात हे पाहून धक्का बसतो," असे म्हणत #MentalHealthMatters हा हॅशटॅग जोडला. त्याशिवाय, ती तिथेच थांबली नाही. या प्रतिक्रियेनंतर एल अँड टीने भारताच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणारे एक निवेदन जारी केले, त्यावरही दीपिकाने आणखी टीका केली आणि म्हटलेची, "त्यांनी परिस्थिती आणखी वाईट केली."

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now