Rajasthan Road Accident: राजस्थान येथे झालेल्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू, 2 जण जखमी

मंगळवारी ही माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, दुचाकी आणि जीप यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला.

Accident (PC - File Photo)

Rajasthan Road Accident: राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. मंगळवारी ही माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, दुचाकी आणि जीप यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, फलासिया पोलीस स्टेशन हद्दीतील उदयपूर-अबू रस्त्यावर लग्नाच्या मिरवणुकीत जात असलेल्या जीपला भरधाव दुचाकीची धडक बसली. दुचाकीवरून तीन तरुण मित्र  कुठेतरी जात होते. या अपघातात दुचाकीवरील सुनील, राहुल आणि दीपक (वय 18-20 वर्षे) यांचा डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे देखील वाचा: Rajasthan Road Accident: सड़क हादसे में तीन युवकों की मौत, दो अन्य घायल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धडकेमुळे दुचाकीची पेट्रोल टाकी फुटली आणि दुचाकी आणि जीपने पेट घेतला. जीपमधील सहा प्रवाशांपैकी दोन जण भाजले असून त्यांना उदयपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.