Rajasthan: उदयपूर पॅलेसमध्ये प्रवेशावरून राजघराण्यातील दोन गटांमध्ये हाणामारी (Watch Video)
आमदारांच्या समर्थकांनी दगडफेक सुरू करून राजवाड्याच्या गेटवर तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. काही लोक राजवाड्याच्या आतून हल्ले करत होते. तणाव वाढल्यानंतर पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केला. यानंतर विश्वराज सिंह यांना सिटी पॅलेसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली.
Rajasthan: मेवाड राजघराण्यातील विश्वराज सिंह मेवाड यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात सोमवारी वाद झाला. राज्याभिषेकानंतर(Royal family) विश्वराज सिंह मेवाड (Vishvaraj Singh Mewar)सिटी पॅलेसमध्ये त्यांचे कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते, परंतु त्याआधी सिटी पॅलेसमध्ये (City Palace) कोणालाही अनधिकृत प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. महाराणा मेवाड फाऊंडेशनच्यावतीने ही बंदी घालण्यात आली. ज्यांचे अध्यक्ष दिवंगत महेंद्रसिंग मेवाड यांचे लहान भाऊ अरविंद सिंग मेवाड आहेत. (Old Age Pension in Delhi: केजरीवालांची भेट, दिल्लीत वृद्धांना पेन्शन पुन्हा सुरू; आता तुम्हाला दर महिन्याला एवढे पैसे मिळतील)
या प्रकरणामुळे राजपूत समाजात संताप व्यक्त होत आहे. रात्री उशिरा दगडफेक झाली. सध्या परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. सोमवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये शेकडो लोक रस्त्यावर उतरल्याचे दिसत होते. सिटी पॅलेसच्या बाहेर विश्वराज यांच्या समर्थनार्थ ते तळ ठोकून बसलेले दिसले. (Coast Guard Seizes Drugs in Andaman: भारतातील आजपर्यंतची सर्वात मोठी ड्रग्जची खेप जप्त, 5 टन ड्रग्ज अंदमानमध्ये सापडले)
एएनआय या वृत्तसंस्थेवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ आणि माहितीनुसार, राजसमंदचे भाजप आमदार आणि मेवाडचे महाराणा विश्वराज सिंह आणि त्यांचे समर्थक यांना राजवाड्यात प्रवेश करण्यापासून रोखल्यानंतर सिटी पॅलेसच्या बाहेर तळ ठोकून आहेत. मेवाडचे ७७ वे महाराणा हे विश्वराज सिंह आहेत. त्यांच्या राज्याभिषेकानंतर त्यांचा चुलत भाऊ डॉ लक्ष्य राज सिंह मेवाड आणि काका अरविंद सिंह मेवाड यांच्याशी वाद झाला होता.
परिस्थिती इतकी बिकट झाली की दगडफेकही सुरू झाली. मिळालेल्या वृत्तानुसार, राजघराण्यातील वादाला हिंसक वळण लागले. वाद वाढत असताना दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. व्हिडिओमध्ये अनेक संतप्त लोक दगडफेक करताना दिसत आहेत. नुकतेच मेवाड राजघराण्याचे ज्येष्ठ पुत्र महेंद्र सिंह मेवाड यांचे निधन झाले.
मेवाड राजघराण्याच्या परंपरेनुसार महेंद्रसिंग मेवाड यांचे पुत्र विश्वराज सिंह यांचा राज्याभिषेक सोहळा सोमवारी चित्तौडगड येथील फतेह प्रकाश महल येथे आयोजित करण्यात आला होता. सोमवारीच, दिवंगत महेंद्र मेवाड यांचे धाकटे बंधू अरविंद सिंग मेवाड यांच्या नेतृत्वाखालील ट्रस्टने विविध वृत्तपत्रांमध्ये एक सामान्य नोटीस जारी केली होती, ज्यामध्ये असे म्हटले होते की सिटी पॅलेस आणि एकलिंग जी मंदिरात कोणत्याही अनधिकृत प्रवेशास मनाई केली जाईल. त्यानंतर हा वाद उफळला.