Bharat Jodo Yatra: इंदूरमध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस प्रशासन अलर्टवर

सध्या पोलिस शेजारी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पत्र सोडून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

राहुल गांधी आणि धमकीचं पत्र (PC - PTI, Twitter @news24tvchannel)

Bharat Jodo Yatra: इंदूरमध्ये काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बॉम्बची धमकी (Bomb Threat) मिळाल्यानंतर जिल्हा आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. जुनी इंदोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र सापडले आहे. सध्या पोलिस शेजारी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पत्र सोडून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या जुनी भागात असलेल्या एका मिठाईच्या दुकानात अज्ञात व्यक्तीने पत्र टाकले होते. हा प्रकार दुकानमालकाने पाहिल्यानंतर त्यांनी हे पत्र पोलिसांच्या ताब्यात दिले. या पत्रात राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेचा भाग म्हणून इंदूरच्या खालसा कॉलेजमध्ये थांबल्यास बॉम्बने स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. (हेही वाचा - Rajiv Gandhi Murder Case: राजीव गांधी हत्येतील दोषींच्या सुटकेविरोधात केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव, पुनर्विचार याचिका केली दाखल)

डीसीपी इंटेलिजन्स रजत सकलेचा यांनी धमकीचे पत्र मिळाल्याची पुष्टी केली असून हे पत्र उज्जैनमधून आल्याचे त्यांनी सांगितले. किंबहुना या पत्रात एका आमदाराच्या नावाचाही उल्लेख आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला 24 ऑक्टोबरपासून मध्य प्रदेशातून सुरुवात झाली होती. याप्रकरणी पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. नुकतेच पंजाबच्या कीर्तनकाराने खालसा कॉलेजमधील प्रकाश पर्व कार्यक्रमादरम्यान प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांना सन्मानित केल्याबद्दल टीका केली होती. यापुढे कधीही इंदूरला येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून बराच वाद झाला होता.