Punjab Police: ड्रग्ज आणि शस्त्र तस्करी प्रकरणात आणखी तिघांना अटक, पंजाब पोलिसांची कारवाई, 3.5 किलो हेरॉईन जप्त

पंजाब पोलिसांनी सोमवारी मन्नू महावा कार्टेलच्या आणखी तीन सदस्यांना अटक केले आहे

Drugs PC Twitter

Punjab Police: पंजाब पोलिसांनी सोमवारी मन्नू महावा कार्टेलच्या आणखी तीन सदस्यांना अटक केले आहे. सोबत अतिरिक्त 3.5 किलो हेरॉईन जप्त केले आहे. याच प्रकरणातून पोलिसांनी  22.5 किलो हेरॉईन जप्त केले आहे. अटक केलेले तीघे जण हे अमृतसर येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून हेरॉईन जप्त करण्याव्यतिरिक्त, 30 बोअरची 10 जिवंत काडतुसे आणि 9 एमएमची 9 जिवंत काडतुसे आणि एक सफारी कार देखील जप्त केली आहे. हेही वाचा- बोरिवलीतील गेस्ट हाऊसमधून 3 बंदुका, 36 जिवंत काडतुसं जप्त,

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे  बलराज सिंग उर्फ ​​काका, अनमोल सिंग उर्फ ​​लालू आणि सरबजीत सिंग असे आहेत. या प्रकरणात अद्याप पोलिसांनी १० आरोपींना अटक केले आहे. अमृतसर पोलिसांनी यूएसए स्थिक तस्कर मनप्रीत उर्फ मन्नू महावा याच्या दोन प्रमुख व्यक्तींना अटक केली. सोबत १९ किलो हेरॉईन जप्त केले. ड्रग्ज आणि शस्त्रास्तांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याच्या एका आठवड्यानंतर ही घटना घडली आहे.

अमृतसरचे पोलिस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी सांगितले की, आरोपी अनमोल सिंग उर्फ लालू आणि त्याच्या साथीदार सुलतानविंडच्या परिसरात दिसल्या नतंर पोलिस पथकांनी विशेष नाकाबंदी केली आणि तीन आरोपींना अटक केली. आरोपींकडून पंजाब पोलिसांनी 23 लाखांची ड्रग मनी, 7 पिस्तुल एक 9 एमएम ग्लॉक आणि ड्रोन जप्त केले आहे.ड्रग्ज पुरवठादार, विक्रेते आणि खरेदी करणाऱ्याच्या नेटवर्कवर पंजाब पोलिसांचे लक्ष ठेवण्याचे काम सुरु आहे. या संदर्भात पुढील तपासणी सुरु केली आहे.