IPL Auction 2025 Live

HC Allows PM Modi's Roadshow in Coimbatore: कोईम्बतूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होणार; मद्रास उच्च न्यायालयाने दिली परवानगी

न्यायाधीश एन आनंद व्यंकटेश यांनी सशर्त परवानगी देण्याचे सांगितले. ANI वृत्तसंस्थेनुसार, न्यायाधीश व्यंकटेश यांनी पोलिसांना पंतप्रधान मोदींच्या शहर दौऱ्यादरम्यान चार किमी लांबीच्या रोड शोला सशर्त परवानगी देण्याचे निर्देश दिले.

Madras High Court, PM Modi (PC - Wikimedia Commons/FB)

PM Modi Road Show: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आता 18 मार्च रोजी तामिळनाडूतील कोईम्बतूर (Coimbatore) येथे रोड शो (Road Show) करू शकणार आहेत. मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) शुक्रवारी कोईम्बतूर पोलिसांना पंतप्रधान मोदींच्या रोड शोला परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायाधीश एन आनंद व्यंकटेश यांनी सशर्त परवानगी देण्याचे सांगितले. ANI वृत्तसंस्थेनुसार, न्यायाधीश व्यंकटेश यांनी पोलिसांना पंतप्रधान मोदींच्या शहर दौऱ्यादरम्यान चार किमी लांबीच्या रोड शोला सशर्त परवानगी देण्याचे निर्देश दिले.

यापूर्वी, तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा धोके, कोईम्बतूरचा सांप्रदायिक इतिहास आणि जनतेची, विशेषतः विद्यार्थ्यांची संभाव्य गैरसोय यामुळे पंतप्रधान मोदींच्या रोड शोला परवानगी नाकारली होती. पंतप्रधान मोदींच्या चार किलोमीटर लांबीच्या रोड शोची सांगता 1998 मध्ये कोईम्बतूर बॉम्बस्फोट झालेल्या मैदानावर होणार होती. या स्फोटात 58 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. तामिळनाडू पोलिसांच्या निर्णयाविरोधात भाजपने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने सायंकाळी उशिरा भाजपच्या बाजूने निकाल दिला. (हेही वाचा -Code Of Conduct: आचारसंहिता म्हणजे काय? त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार? या कालावधीत कोणते निर्बंध असतील? जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, 18 मार्च रोजी राज्यातील जगतियाल येथे होणाऱ्या सभेला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. 5 मार्च रोजी, पंतप्रधानांनी हैदराबादपासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या संगारेड्डीमध्ये 7,200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली होती. (हेही वाचा -Lok Sabha Elections 2024 Dates Announcement Update: लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा 16 मार्चला दुपारी 3 वाजता होणार जाहीर)

भाजप दक्षिणेकडील राज्यात लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तेलंगणातील एकूण 17 लोकसभा जागांपैकी चार जागा जिंकल्या होत्या. शनिवारी निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे.