Ravish Tiwari Passed Away: ज्येष्ठ पत्रकार रविश तिवारी यांचे निधन, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

ज्येष्ठ पत्रकार विकास भदौरिया यांनी तिवारी यांच्या निधनाची बातमी ट्विटरवर शेअर केली आहे.

Senior journalist Ravish Tiwari (PC - Twitter)

Ravish Tiwari Passed Away: ज्येष्ठ पत्रकार आणि इंडियन एक्स्प्रेसचे राष्ट्रीय ब्युरो प्रमुख रवीश तिवारी (Ravish Tiwari) यांचे निधन झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिवारी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'पत्रकारिता ही रवीश तिवारी यांची आवड होती. किफायतशीर व्यवसायांपेक्षा त्याने त्याची निवड केली. वृत्तांकन आणि धारदार भाष्य करण्याची त्यांची हातोटी होती. त्यांच्या आकस्मिक आणि धक्कादायक निधनाने माध्यमातील एक वेगळा आवाज दाबला गेला. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांबद्दल माझ्या संवेदना.'

पंतप्रधानांनी त्यांचे वर्णन 'अंतर्ज्ञानी' आणि 'नम्र' असे केले आहे. पीएम मोदींनी ट्विट केलं आहे, "नियतीने रवीश तिवारी यांना लवकरच आमच्याकडून हिसकावून घेतले आहे. मीडिया जगतातील उज्ज्वल कारकीर्द संपुष्टात आली आहे. त्यांचे अहवाल वाचण्यात आणि त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधण्यात मजा येत होती. ते 'अभ्यासू' आणि 'नम्र' होते. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!"

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ट्विट -

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट -

ज्येष्ठ पत्रकार विकास भदौरिया यांनी तिवारी यांच्या निधनाची बातमी ट्विटरवर शेअर केली. त्यांनी ट्विट करत सांगितलं की, "गंभीर पत्रकार, महान माणूस आणि माझा प्रिय मित्र रवीश तिवारी यांचे काल (शुक्रवारी) रात्री निधन झाले. आज दुपारी 3.30 वाजता सेक्टर-20, गुडगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. ओम शांती शांती शांती."