Delhi Shocker: लग्नाच्या दबावामुळे प्रियकराकडून गर्भवती प्रेयसीची हत्या, मृतदेह हरियाणातील शेतात पुरला

पश्चिम दिल्लीच्या नांगलोई येथील एका तरूणीची प्रियकराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. तरूणी गर्भवती होती. त्यामुळे ती आरोपीकडे सतत लग्नासाठी विचारणा करत होती.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Delhi Shocker: दिल्लीतील एका गर्भवती तरूणीचा, प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी खून केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे हत्येनंतर तरूणीला जमिनीत पुरले होते. तरूणी गर्भवती होती, त्यामुळे तिला आरोपीशी लग्न करायचे होते. सोनिया असे मृत गर्भवती तरुणीचे नाव होते. ती सोशल मीडियावर सक्रिय होती. तिचे 6,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. सोशल मीडियावर तिने तिचा प्रियकर संजू उर्फ ​​सलीमसह स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते, असे मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे.

दिल्लीतील त्या तरुणीचा मृतदेह आरोपीने मित्रांच्या मदतीने हरियाणातील रोहतक येथील एका शेतात चार फूट खोल खड्ड्यात पूरला होता. पोलिस तपासात त्याने ही गोष्ट कबूल केली. त्यानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. ती सात महिन्यांची गरोदर होती आणि सलीमशी लग्न करण्याचा आग्रह करत होती. मात्र, तो लग्नास तयार नव्हता. तिला गर्भपात करायचा होता. (HC on Animal Cruelty: 'देवाचे आभार ब्लू व्हेल जमिनीवर नाही'; सण-सामाजिक कार्यांत हत्तींच्या परेडवर केरळ उच्च न्यायालयाचे निरिक्षण)

यावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत होती. सोमवारी ती घरून काही वस्तू घेऊन आरोपीला भेटायला गेली. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. सोनिया घरी आली नसल्याचे घरच्यांना कळताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांना 23 ऑक्टोबरला तक्रार मिळाली, ज्याच्या मदतीने आरोपीला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने कबुली दिली की, त्याने हा खून पूर्वनियोजित केला होता आणि या गुन्ह्यात त्याचे मित्र रितिक आणि पंकज यांचा सहभाग होता.

त्यांनी या कृत्यासाठी करवा चौथचा दिवस निवडला. प्रसंगी कार भाड्याने घेतली. त्या रात्री सोनिया सामान घेऊन घरातून निघाली असता तिची नांगलोई परिसरात आरोपीशी भेट झाली. त्यानंतर त्याने तिला थेट रोहतकला नेले. जिथे सलिमने तिचा गळा दाबून खून केला आणि रात्री दिल्लीला परतण्यापूर्वी तिचा मृतदेह रोहतकच्या जंगलात पुरला. पोलिसांनी सलीम आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे, तर दुसरा फरार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement