Uttar Pradesh: संतापजनक! मद्यधुंद अवस्थेत तरुणाचा प्रताप, भररस्त्यात बसलाय खुर्चीवर (Watch Video)

कधी मद्यधुंद अवस्थेत तोडफोड केल्याची तर कधी भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण मद्यधुंद अवस्थेत असलेला भररस्त्यात खुर्चीवर बसला आहे.

Up Viral video pC X

Uttar Pradesh: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कधी मद्यधुंद अवस्थेत तोडफोड केल्याची तर कधी भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण मद्यधुंद अवस्थेत असलेला भररस्त्यात खुर्चीवर बसला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरुणाला एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकची धडक लागलीच असती परंतु तो यातून थोडक्यात बचावला आहे. (हेही वाचा- घरात शिरून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी भंगारवाल्याचे दुकान संतप्त जमावाने पेटवले)

मिळालेल्या माहितीनुसार,  उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीचा वेगळाच प्रताप पाहायला मिळत आहे. भररस्त्यात त्याने खुर्चीवर बसलेला दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना चिलबिला चौकात घडली आहे. रस्त्यावरून अनेक वाहने जात आहे. भररस्त्यात खुर्चीवर बसलेला असताना एका ट्रकच्या धडकेत तो थोडक्यात बचावला आहे.

पहा प्रतापगड येथील व्हिडिओ

एकाने या प्रकरणी सांगितले की, समोरच पोलिस ठाणे आहे तरी ही तो रस्त्याच्या मदोमध बसला आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आणि सदर व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिस या प्रकरणी सदर व्यक्तीला या घटनेचा जाब विचारत आहे. या प्रकरणी त्याच्यावर लवकर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.