Vanchit Bahujan Aaghadi Election Symbol: वंचित बहुजन आघाडीस निवडणूक चिन्ह मिळाले; घ्या जाणून

प्रकाश आंबेडकर () यांच्या नेतृत्वाखाली विविध निवडणुका लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi Election Symbol) पक्षाचेच निवडणूक चिन्ह अखेर निश्चित झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पक्षाला निवडणूका लढण्यासाठी 'गॅस सिलेंडर' (Gas Cylinder) हे चिन्ह दिले आहे.

Prakash Ambedkar (Photo Credit: X)

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर () यांच्या नेतृत्वाखाली विविध निवडणुका लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi Election Symbol) पक्षाचेच निवडणूक चिन्ह अखेर निश्चित झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पक्षाला निवडणूका लढण्यासाठी 'गॅस सिलेंडर' (Gas Cylinder) हे चिन्ह दिले आहे. आगोयाच्या सचिवालयाने त्याबाबतचे पत्र नुकतेच पक्षाला दिले. त्यामुळे या पक्षाला एकाच निवडणूक चिन्हावर राज्यभरात विविध प्रकारच्या निवडणुका लढवता येणे शक्य झाले आहे. या चिन्हामुळे पक्षाच्या निवडणूक लढविण्याच्या प्रक्रियेत आणि उमेदवारांच्या ओळखीमध्ये निश्चित स्वरुाची सुसूत्रता येणे शक्य होणार आहे. पक्षाने आपल्या सोशल मीडिया मंचावरुन चिन्हाबाबत माहिती दिली आहे.

कामगिरी सुमार पण टक्का उत्तम

वंचित बहुजन आघाडीने आपल्या एक्स हँडलवर पोस्ट शेअर करत दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय निवडणूक आयोगाने ने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर चिन्ह दिले आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी पाठिमागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवरील विविध निवडणुकांमध्ये सक्रीय सहभाग घेत आली आहे. या निवडणुकांमधील पक्षाची कामगिरी तिथकीशी समाधानकारक केव्हाच राहीली नाही. असे असले तरी, पक्षाने आपला मतदारांचा विशिष्ठ टक्का मात्र कायम ठेवला आहे. त्यामुळे पक्षाचा जनाधार राज्यात कायम असल्याचे नेहमीच स्पष्ट झाल्याचे पाहायला मिळत होते. असे असले तरी पक्षाला अद्यापही निवडणूक चिन्ह मिळाले नव्हते. परिणामी एकाच निवडणुकीत पक्षाला वेगवेगळ्या चिन्हावर उमेदवार उभे करावे लागत होते. (हेही वाचा, Narsing Udgirkar: वंचितच्या पराभूत उमेदवाराने एकाच दिवशी बुक केल्या आलिशान Range Rover आणि Toyota Fortuner; किंमत फक्त 4 कोटी)

पक्ष कार्यकर्त्यांची मरगळ झटकणार?

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. अशा वेळी वंचित बहुजन आघाडी तरी कशी मागे राहणार. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला खरेतर समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यांचा एकही उमेदवार या निवडणुकीत निवडून आला नाही. पक्षाचे सर्वोच्च नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचाही या मतदारसंगातून पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये बरीचशी मरगळ आल्याचे पाहायला मिळाले. पण, अशा स्थितीत पक्षाला मिळालेले निवडणूक चिन्ह कार्यकर्त्यांसाठी नवी प्रेरणा ठरु शकते. वंचितच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक चिन्ह मिळाल्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. (हेही वाचा, Ahmednagar News: अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक)

वंचित बहुजन आघाडी नेहमीच आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चे असते. सुरुवातीला अत्यंत कट्टर समजल्या जाणाऱ्या एमआयएम पक्षाशी केलेली युती, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरुन महाविकासआघाडीसोबत घेतलेली भूमिका आणि नंतरचा निर्णय अशा एक ना अनेक कारणांनी हा पक्ष चर्चेत राहिला आहे. पक्षाने नुकतीच आरक्षण बचाव यात्रा काढली. 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात पार पडलेल्या यात्रेच्या माध्यमातून पक्षाने आपली भूमिका लोकांपर्यं पोहोचवली. ही पार्श्वभूमी असताना पक्षाला मिळालेले चिन्ह निवडणुकीत यश मिळवून देते का? याबाबत उत्सुकता आहे.