UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश मध्ये शिवसेना विधानसभा निवडणूकीसाठी कोणासोबतही युती करणार नाही - शिवसेना नेते संजय राऊत
आज (13 जानेवारी) संजय राऊत पश्चिम उत्तर प्रदेशच्या दौर्यावर आहेत.
उत्तर प्रदेश निवडणूकीचे (UP Assembly Election) पडघम वाजल्यानंतर आता राजकीय जुळवाजुळवीची गणितं सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष (Shiv Sena) देखील उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीत आपले उमेदवार उभे करणार आहेत. काल खासदार आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना 50-100 जागांवर निवडणूक लढू शकते. पण या निवडणूकीसाठी शिवसेना युपी मध्ये कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी आपले समाजवादी पक्षासोबत वैचारिक मतभेद असल्याचं सांगितले आहे. 'आम्ही उत्तर प्रदेशामध्ये मोठ्या कालावधीपासून काम करत आहोत पण अजूनपर्यंत कधी निवडणूक लढलो नव्हतो. आम्हांला यापूर्वी कधी भाजपा ला दुखावायचे नव्हते म्हणून आम्ही थेट निवडणूकीच्या रिंगणात कधीही न उतरल्याचे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आज (13 जानेवारी) संजय राऊत पश्चिम उत्तर प्रदेशच्या दौर्यावर आहेत. हे देखील नक्की वाचा: UP Assembly Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात लढणार, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी- शरद पवार.
ANI Tweet
युपी मध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. आणि 10 मार्चला विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. उत्तर प्रदेश मध्ये विधानसभेच्या एकूण जागा 403 आहेत. सध्या योगी सरकारमध्ये भाजप कडे 325, समाजवादी पक्ष कडे 47,बसपा कडे 19 आणि काँग्रेस कडे 7 जागा आहेत.