सुप्रिया सुळे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकेचा वर्षाव

सध्या अनेक नेते त्यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये (Bhartiya Janta Party) प्रवेश करत आहेत, अशा नेत्यांनाही सुप्रिया सुळे यांची खडबोल सुनावले आहेत. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रात (Maharashtra) बेरोजगारी वाढत जात आहे, याकडे मुख्यमंत्री दुर्लक्ष करीत आहेत. मुख्यमंत्री केवळ विकासाच्या वार्ता करत फिरत आहेत. त्याचबरोबर हे सरकार केवळ अश्वासन देण्याचे काम करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

Supriya Sule (Photo Credits-Twitter)

राष्ट्रवादीच्या (Rashtrawadi Congress Party)मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टिका केल्या आहेत. सध्या अनेक नेते त्यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये (Bhartiya Janta Party) प्रवेश करत आहेत, अशा नेत्यांनाही सुप्रिया सुळे यांची खडबोल सुनावले आहेत. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रात (Maharashtra) बेरोजगारी वाढत जात आहे, याकडे मुख्यमंत्री दुर्लक्ष करीत आहेत. मुख्यमंत्री केवळ विकासाच्या वार्ता करत फिरत आहेत. त्याचबरोबर हे सरकार केवळ अश्वासन देण्याचे काम करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

नुकताच नाशिक येथे राष्ट्रवादी मेळावा पार पडला. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. एका पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी हा रसायनचा विकास आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच टोकावर धरले आहे. माणसे साफ करणारी कसली वॉशिंग पावडर भाजपाकडे आहे? अशी विचारणा यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. देशात आम्ही सगळीकडे तीन नंबरला असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता त्यांनी मंदीतला क्रमांक सांगितला की विकासामधला हे माहिती नाही ? असा टोलाही त्यांनी लगावला. हे देखील वाचा-नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान मोदी यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण, एकास अटक

सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. नाशिक जिल्यामधून १० हजाराहून अधिक कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. ज्या लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमवल्या आहेत, अशा कर्मचाऱ्यांनी त्यांचे बायोडाटा माझ्याकडे द्या, मी मुख्यमंत्र्याकडे पाठवते. भाजपचे सरकार केवळ अश्वासन देण्याचे काम करत आहे. आकर्षित भाषण करुन सामान्य जनेतेची दिशाभूल केली जात आहे. पक्ष बदलणाऱ्यांवर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी पक्ष बदलणे मोबाइलच्या सीम कार्डसारखे झाले आहे, जो जास्त बोलायला देणार त्याचे सीमकार्ड वापरायचे अशी टीका केली.