Rajya Sabha Election 2022: कपिल सिब्बल काँग्रेसचा पंजा सोडून समाजवादी पक्ष प्रवेशाची शक्यता; डिंपल यादव यांच्यासह राज्यसभा निश्चित

समजावदी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपल यादव यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच समाजवादी पक्षाच्या कोट्यातून जाणाऱ्या राज्यसभा उमेदवारांमध्ये काँग्रेस नेते आणि भारतातील नामवंत वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal), जावेद अली खान यांच्याही नावाचा समावेश आहे.

Kapil Sibal | Twitter

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) उमेदवार निश्चित केले आहेत. समजावदी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पत्नी डिंपल यादव (Dimple Yadav) यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच समाजवादी पक्षाच्या कोट्यातून जाणाऱ्या राज्यसभा उमेदवारांमध्ये काँग्रेस (Congress) नेते आणि भारतातील नामवंत वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal), जावेद अली खान यांच्याही नावाचा समावेश आहे. कपिल सिब्बल हे प्रदीर्घ काळ काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राहिले आहेत. तर जावेद अली खान हे आगोदरही समाजवादी पक्षाकडून राज्यभेवर खासदार राहिले आहेत. कपिल सिब्बल आज सपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातून निवडल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या 11 जागांसाठी 24 मे पासून नामांकन प्रक्रिया सुरु झाली आहे. संख्याबळाच्या गणितानुसार समाजवादी पार्टी तीन उमेदवार राज्यसभेवर पाठवू शकते. आतापर्यंत राज्यसभेमध्ये सपाचे पाच सदस्य आहेत. यात कुंवर रेवती रमन, विशंभर प्रसाद निषाद आणि चौधरी सुखराम सिंह यादव यांचा समावेश आहे. या सर्वांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी समाप्त होत आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2022: 'महाराजांना राजकीय पक्षाचे वावडे नसावे' म्हणत संभाजीराजे छत्रपती यांचा विषय संपवला, शिवसेनेकडून संजय पवार यांना संधी, लवकरच घोषणा)

देशातील प्रसिद्ध वकील आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा राज्यसभा कार्यकाळ समाप्त होतो आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसकडून पुन्हा संधी मिळणे कठीण मानले जात आहे. त्यातही संख्याबळाचे गणित आणि जी-23 पैकी एक असलेल्या सिब्बल यांनी काही काळांपासून काँग्रेसवर केलेली टीका पाहता त्यांचे राज्यसभेवर जाणे अधिकच कठिण होते. तसेही या पूर्वीसुद्धा कपील सिंब्बल जरी काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेत पोहोचले असले तरी त्यांना मतांचे गणीत जमविण्यासाठी सपाचाच आधार घ्यावा लागला होता. दुसऱ्या बाजूला अशीही चर्चा होती की, या वेळी कपिल सिब्बल झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) यांच्या पाठिंब्याने राज्यसभेत जाऊ शकतात.

उत्तर प्रदेश विधानसभा बलाबल

दरम्यन, जागांचे वरील गणित लक्षात घेता 11 व्या जागेसाठी मात्र समाजवादी पक्ष आणि गठबंधन यांच्यात जोरदार रस्सीखेच निर्माण होणार आहे. त्यामुळे इथे घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तरप्रदेशच्या राजकारणात दुसऱ्या बाजूला अशीही चर्चा आहे की, समाजवादी पक्षाने आजम खान यांची उपेक्षा केली आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर आजम खान यांचे पुनर्वसन केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सपाने या शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. आजम खान यांनी कारागृहातून बाहेर आल्यानंतर म्हटले होते की, माझ्या विनाशासाठी माझ्या समर्थकांचाच हात आहे. दरम्यान, असेही मानले जात आहे की, आजम खान यांना आणि समाजवादी पक्षालाही जर कायदेशीर लढा द्यायचा असेल तर कपिल सिब्बल यांच्यासारख्या तगड्या वकिलाचा चांगलाच फायदा होणार आहे. राज्यसभा निवडणूक 2016 मध्ये कपिल सिब्बल राज्यसभेवर गेले होते. ते काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभेत पोहोचले असले तरी मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना समाजवादी पक्षाचीच मदत घ्यावी लागली होती. विद्यमान स्थिती उत्तर प्रदेशमद्ये काँग्रेसकडे विधानसभेचे केवळ दोन आमदार आहेत.