Rajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल इथे पाहा ठळक घडामोडी
Rajasthan Assembly Elections Results 2018: या आधीच्या विधानसभा निवडणुकीसाठी 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत 143 जागा आणि 45.17 टक्केच मतदानन मिळवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता.तर, काँग्रेस केवळ 21 जागा आणि 33.8 टक्के मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर होती.
Rajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थान (Rajasthan) विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (मंगळवार, 11 डिसेंबर) होत आहे. ही निवडणूक एकूण 199 जागांसाठी पार पडली. त्यासाठी 2274 उमेदवार रिंगणात होते. यात भारतीय जनता पक्ष (BJP)199, काँग्रेस 194, बहुजन समाजवादी पक्ष (BSP) 189, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)1, भारतीय कमुनिस्ट पक्ष (CPI) 16 , मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्ष (CPM) 28, हनुमान बेनिवाल यांचा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष 57 जागा लढवत आहेत. तर, 338 उमेदवारही रिंगणात आहेत.
दरम्यान, अलवार जिल्ह्यातील रामगढ मतदारसंघात बहुजन समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचे निधन झाल्यामुळे येथील मतदान स्थगित करण्यात आले आहे. राज्यात या वेळी 74.3 टक्के इतके मतदान झाले. (हेही वाचा, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगढ, मिझोराम काही वेळातच मतमोजणी सुरु, आज कळणार जनतेचा कौल)
या आधीच्या विधानसभा निवडणुकीसाठी 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत 143 जागा आणि 45.17 टक्केच मतदानन मिळवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता.तर, काँग्रेस केवळ 21 जागा आणि 33.8 टक्के मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर होती. 3.48 टक्के मते मिळालेल्या बसपा केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. त्यामुले या निवडणुकीत कोण बाजी मारतंय याबाबत उत्सुकता आहे.