'चौकीदार चौर है' म्हणणे राहुल गांधी यांना पडले महागात, आता नेटकऱ्यांकडून 'राहुल का बाप चौर है' च्या घोषणा (Video)
मात्र सध्या सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी राजस्थान येथील डूंगापूरच्या सगवाडा येथे संभेला संबोधित करताना 'गली-गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है', अशा तीव्र शब्दात टीका केली होती. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक वेळी सध्या भाजप आणि काँग्रेस पक्षात एकमेकांवर कुरघोडी केली जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत.
या व्हिडिओमध्ये 'चौकीदार प्योर है राहुल का बाप चौर है' असे म्हटले जात असल्याचा व्हिडिओ भाजप पक्षाचे प्रवक्ते तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये एका बसमधील मंडळी 'राहुल गांधी का बाप चौर है' (Rahul Ka Baap Chor Hai)अशा घोषणा मोठ्याने करताना दिसून येत आहेत. तर ट्वीटरवर या नावाचा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये झळकत आहे.
यापूर्वी ही राजधानी दिल्ली येथे राहुल गांधी यांनी चौकीदार चौर असल्याचा क्राईम थ्रिलर सुरु असल्याचे म्हटले होते. त्यावेळी सीबीआय प्रकरणावरुन राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधत टीका केली होती.