प्रियांका गांधी आजपासून बोटीतून गंगायात्रा करणार
काँग्रेस पक्ष (Congress) अधिक मजबूत बनवण्यासाठी सोमवारी (18 मार्च) प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) पुढील तीन दिवस गंगायात्रा (Ganga River) बोटीतून करणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षाकडून त्यांच्या उमेदवारांचे चेहरे समोर आणले जात आहेत. या पार्श्वभुमीवर सर्वांची नजर देशातील सर्वात मोठे क्षेत्र असलेल्या युपी (UP) वर आहे. काँग्रेस पक्ष (Congress) अधिक मजबूत बनवण्यासाठी सोमवारी (18 मार्च) प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) पुढील तीन दिवस गंगायात्रा (Ganga River) बोटीतून करणार आहे. तसेच प्रियांका गांधी यांच्या यात्रेची सुरुवात प्रयागराज (Prayagraj) येथून होणार आहे.
प्रियांका गांधी पुढील तीन दिवसात जवळजवळ 140 किमी अंतर पार करत वाराणसी येथे पोहचणार आहे. या बोट यात्रेसाठी खास तयारी करण्यात आली आहे. तर बोटीला एका वधुप्रमाणे सजवण्यात आले आहे. गंगायात्रेला सुरुवात करण्यापूर्वी प्रियांका गांधी संगम येथे स्नान करणार असून छतनाग येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. यात्रेच्या दरम्यान प्रियांका गांधी नदी किनारी येणाऱ्या गावांना भेट देणार आहे. त्याचसोबत तेथील विविध संघटनांशी चर्चा करणार आहे.(हेही वाचा-Lok Sabha Election 2019: काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर)
ANI ट्वीट:
प्रयागराज येथे प्रियांका गांधी यांचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत. पोस्टरवर प्रियांका गांधी यांना साथ देणारे शब्द मांडण्यात आले आहेत. असे सांगितले जात आहे की, आजपासून गेल्या पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून त्यांची उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी मोदी यांनी असे म्हटले होते की, मी स्वत: येथे आलो नसून गंगा नदीने मला येथे बोलावले होते.