Chaudhary Ajit Singh Political Career: लोक दल पार्टीचे नेतृत्व मग Rashtriya Lok Dal पक्षाची स्थापना; IIT खडगपूर येथून इंजीनियरिंग केलेल्या अजित सिंह यांचा हा राजकीय प्रवास

त्यांनी वयाची 80 पार केली होती. तरीही त्यांचे अगदी अलीकडपर्यंत राजकारणात सक्रिय असणे अनेकांसाठी महत्त्वपूर्ण होते.

Chaudhary Ajit Singh | (PC - RLD)

अजित सिंह ( Ajit Singh), राष्ट्रीय लोकदल (Rashtriya Lok Dal) अर्थातच आरएलडी (RLD) या पक्षाचे अध्यक्ष. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गामुळे निधन झाले. संसदीय राजकारणाचा जवळपास 35 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असलेले आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांचे पूत्र अजित सिंह (Chaudhary Ajit Singh) काळाच्या पडद्याआड गेले. त्यांनी वयाची 80 पार केली होती. तरीही त्यांचे अगदी अलीकडपर्यंत राजकारणात सक्रिय असणे अनेकांसाठी महत्त्वपूर्ण होते. पश्चिम उत्तर प्रदेश लोकसभा मतदारसंघातून ते 7 वेळा खासदार म्हणून निवडूण आले आणि अनेक वेळा केंद्रात मंत्रिही राहीले. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि देशाच्या राजकारणात अजित सिंह (Ajit Singh Political Career) यांना नेहमीच एक आदराचे स्थान राहिले. अशा या अजित सिंह यांच्या राजकीय प्रवासावर (Political journey of Ajit Singh) टाकलेला हा अल्पकटाक्ष.

स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या अजित सिंह (12 February 1939 ) यांची शैक्षणीक पार्श्वभूमी दमदार होती. खरं म्हणजे 1939 मध्ये जन्मलेल्या अजित सिंह यांचा काळ म्हणजे शिक्षणाचे फारसे वारे नसलेला काळ. त्या काळात अपवाद वगळता लोक शेती, व्यवसाय आणि पोटासाठी मिळेल ते काम करत असत. अशा काळात मेरठ येथील भडोला गावात जन्मलेला हा मुलगा शाळेत गेला, शिकला आणि पुढे आयआयटी खडगपूर ( IIT Kharagpur ) येथून अभियंता (इंजिनीअर) झाला. (हेही वाचा, Mamata Banerjee Political Career: ममता बॅनर्जी यांचा संघर्ष, राजकारण आणि सत्ता)

Chaudhary Ajit Singh | (PC - Facebook)

अजित सिंह यांनी पुढे अमेरिकेतील इलिनॉइस इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (Illinois Institute of Technology) येथूनही शिक्षण घेतले. विदेशात शिक्षण घेतल्यावर जवळपास 17 वर्षे त्यांनी अमेरिकेतच कॉर्पोरेट विश्वात काम केले. पुढे वडील चौधरी चरण सिंह हे वार्धक्याकडे झुकल्याने अजित सिंह भारतात आले. 1980 मध्ये ते भारतात आले. चौधरी चरण सिंह यांनी त्यांच्याकडे लोकदलाची धुरा सोपवली.

Chaudhary Ajit Singh | (PC - Facebook)

अजित सिंह यांनी 1986 मध्ये खऱ्या अर्थाने राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1986 मध्ये ते उत्तर प्रदेश राज्यातून राज्यसभेवर गले. पुढे लोकसभा निवडणूक 1989 मध्ये निवडून येत ते लोकसभा खासदार बनले. 1991 मध्येही ते लोकसभेवर गेले. दरम्यानच्या काळात असलेल्या विश्वनाथ प्रता सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांनी 11 महिन्यांसाठी उद्योग मंत्रालयाचा कारभार सांभाळला. पुढे त्यांनी राष्ट्रीय लोकदलाची स्थापना केली आणि नवी सुरुवात केली. 1997 मध्ये ते विजयी झाले. परंतू, 1998 मध्ये त्यांना राजकीय यश लाभले नाही. लोकसभा निवडूक बागपथ येथून ते पराभूत झाले. भाजप नेते सोमपाल शास्त्री यांनी त्यांचा पराभव केला. पुढे 1999, 2004 आणि 2009 असे सलग ते लोकसभेवर गेले. तसेच, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन या पंतप्रधानांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही राहिले.

Chaudhary Ajit Singh | (PC - Facebook)

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2014 मध्ये आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेमध्ये ते पराभूत झाले. तेव्हापासून त्यांची राजकीय कारकीर्द काहीशी झाकोळली गेली. लोकसभा निवडणूक 2019 मध्येही त्यांचा पराभव झाला. उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या पक्षाची काहीशी पिछेहाट झाली. दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना झालेल्या विरोधाचा त्यांना फायदा झाला. कारण उत्तर प्रदेशमध्ये अलिकडेच झालेल्या विविध स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला चांगले यश मिळाले. अजित सिंह यांच्या निधनामुळे एक अनुभवी नेता हरपल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होते आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif