IPL Auction 2025 Live

जीन्स आणि मोबाईल असलेल्या मुली नाही तर 40-50 वर्षांच्या महिलांवर पंतप्रधानांचा प्रभाव, दिग्विजय सिंह यांच वादग्रस्त विधान

तसेच 2024 मध्ये मोदी पुन्हा जिंकले तर प्रथम भारतीय राज्यघटना बदलली जाईल, असेही ते म्हणाले

Digvijay Singh (Photo Credit - PTI)

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह (Congress Leader Digvijay Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (PM Narendra Modi) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना दिग्विजय सिंह म्हणाले की, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर मोदींचा प्रभाव असतो, जीन्स घालणाऱ्या मुलीवर मोदींचा प्रभाव पडत नाही. यासोबतच सावरकर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही दिग्विजय यांनी भारतीय जनता पक्षाला चांगलेच फैलावर घेतले. दिग्विजय सिंह म्हणाले की, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर मोदींचा प्रभाव आहे, जीन्स घालणाऱ्या मुलीवर मोदींचा प्रभाव नाही. तसेच 2024 मध्ये मोदी पुन्हा जिंकले तर प्रथम भारतीय राज्यघटना बदलली जाईल, असेही ते म्हणाले. आरक्षण संपेल, जे मिळत असेल ते संपेल, रशिया आणि चीनचे मॉडेल फॉलो केले जाईल.

दिग्विजय सिंह सावरकरांबद्दल काय म्हणाले ?

दिग्विजय सिंह म्हणाले, "सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही, असे लिहिले आहे. गाय हा स्वतःच्या विष्ठेमध्ये लोळणारा प्राणी आहे, तिचे गोमांस खाणारी ती आपली माता कुठून असू शकते. " यात माझा काही दोष नाही. आमची लढाई आरएसएसशी आहे, असेही ते पुढे म्हणाले. गाईचे मांस खाणारे असे हिंदूही आपल्याकडे आहेत. हा देश विविधतेचा देश आहे. इथे गोमांस खाणारे हिंदूही आहेत आणि गोमांस खाऊ नये असे कुठे लिहिले आहे आणि बहुतेक हिंदू गोहत्येच्या विरोधात आहेत. (हे ही वाचा कृषी कायद्यांबाबत नरेंद्र तोमर यांच्या वक्तव्यावर राकेश टिकैत म्हणाले- लक्षात ठेवा, शेतकऱ्यांसाठी दिल्ली फार दूर नाही.)

मध्य प्रदेशातील बजरंग दलाचे सर्वाधिक गुंडे- दिग्विजय

दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशच्या भाजप सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, "मध्य प्रदेशात बजरंग दलाचे सर्वाधिक गुंड आहेत. पोलिस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. तुम्ही खून करणाऱ्याला नोकरी दिली. त्यांनी आरोप केला की, भाजप बजरंग दलाच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हे मोदींचे सरकार आहे. शिवराज मामू यांच्याकडे वाळू माफियाची टोळी आहे, आता त्यांच्याविरुद्ध लढा द्यावा लागेल, असे ते म्हणाले.