IPL Auction 2025 Live

महाराष्ट्रात लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका होणार? नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना तयारीला लागण्याचे दिले आदेश: सूत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका व्हाव्यात असा मानस निवडणुक आयोगाकडे व्यक्त केल्याची चर्चा आहे.

Prime Minister Narendra Modi | Image Courtesy: PTI

येत्या काही महिन्यातच भारतामध्ये लोकसभेच्या निवडणूकांची (Loksabha Elections 2019)  धामधूम सुरू होणार आहे. मात्र यासोबतच महाराष्ट्र (Maharashtra), हरियाणा (Hariyana) आणि झारखंड(Jharkhand)  या तीन राज्यांमध्ये मुख्यंमंत्र्यांनी विधानसभेच्या (Legislative Assembly Elections)  निवडणुकांसाठीदेखील सज्ज राहण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याची माहिती दिल्लीच्या सूत्रांनी दिली आहे. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार असून ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात या राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका व्हाव्यात असा मानस निवडणुक आयोगाकडे व्यक्त केल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये विधानसभेत भाजपाची स्थिती काय?

महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार आहे. राज्य सरकारमध्ये भाजपा आमदारांचं वर्चस्व असून मुख्यमंत्री भाजापाचा आहे. 90 जागांची हरियाणा विधानसभा देखील भाजपाकडे आहे. सध्या हरियाणात 90 पैकी 47 जागा भाजपा आमदारांकडे आहेत. तर झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 47 जागांपैकी 43 जागा भाजपाकडे आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान, मिझोराम, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे भाजपाचा दारूण पराभव झाला आहे त्यामुळे आगामी निवडणुकांचं योग्य प्लॅनिंग करूनच निवडणुकांना सामोरं जात सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान भाजपासमोर आहे.