PM Modi: नम्र आणि तळमळीचा नेता आज आपल्यात नाही,पंतप्रधान मोदींकडून भावनिक ट्वीट करत मुलायम सिंह यादव यांना भावपूर्ण श्रध्दांजली

भावनापूर्वक ट्वीट कर पंतप्रधान मोदी यांनी मुलायम सिंह यादव यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.

समाजवादी पक्षाचे सर्वोसर्वे मुलायम सिंह यादव (mulayam Singh Yadav) यांचं निधन आज सकाळीचं निधन झालं आहे. 82 व्या वर्षी त्यांनी गुरुग्राम (Gurugram) येथील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. मुलायम सिंह यांच्यावर उपचार सुरु होते पण आज सकाळीचं त्यांची प्राणज्योत मावळली. काल रात्रीपासूनचं मुलायम सिंह यांदव यांची प्रकृती चिंताजनक होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुलायम सिंह यादवयांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्वीट (PM Modi Tweet) केलं आहे, मुलायम सिंह यादवजी हे एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व होते. लोकांच्या समस्यांबद्दल संवेदनशील असणारा एक नम्र आणि तळमळीचा नेता असी त्यांची ओळख होती. मुलायम सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी  तत्परतेने लोकांची सेवा केली आणि लोकनायक जेपी आणि डॉ. लोहिया यांच्या आदर्शांना लोकप्रिय करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.

 

पंतप्रधान मोदी भावनिक होत व्यक्त झाले की, मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राष्ट्रीय राजकारणात आपल्या सृजनशील भुमिका मंडल्या. भारताच्या (India) आणीबाणीच्या (Emergency) काळात त्यांनी लोकशाही (Democracy) टिकवण्यासाठी जे योगदान दिले ते अमुलाग्र आहे. तसेच भारताचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी देशाला सशक्त बनवण्यासाठी उल्लेख काम केले.मुलायम सिंह हे एक अभ्यासपूर्ण नेते असुन राष्ट्रीय हित पुढे नेण्यावर कायम त्यांनी भर दिला आहे. (हे ही वाचा:- Mulayam Singh Yadav Dies: मुलायम सिंग यादव यांचे निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

 

नरेंद्र मोदींनी ते गुजरातचे मुखयमंत्री असताना मुलायमसिंह यादव यांच्याशी झालेल्या संवादाला उजाळा दिला.मुलायम सिंह यांची मत जाणून घ्याययला मला कायमचं आवडायचं. त्यांच्या निधनाने मला वेदना होत आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो समर्थकांच्या संवेदना. असं भावनापूर्वक ट्वीट कर पंतप्रधान मोदी यांनी मुलायम सिंह यादव यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.