INX Media Case:माझ्यावर कोणतेही आरोप नाहीत, गेले 27 तास वकिलांसोबत कायदेशीर बाजू समजून घेत होतो: पी चिदंबरम
चिदंबरम यांनी पत्रकार परिष घेतली. या वेळी त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. बुधवारी (21 ऑगस्ट 2019) सायंकाळी साडेआठ वाजणेच्या सुमारास चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद पाच मिनिटे चालली.
आयएनएकस् मीडिया (INX Media Case) प्रकरणात माझ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोपपत्र दाखल नाही. आयएनएस्स प्रकरणात मी कधीच आरोपी नव्हतो. ना मी, ना माझ्या मुलाने (कार्ती चिदंबरम) काही चूक केली आहे. मी कोठेही गेलो नव्हतो, गेल्या 27 तासांत मी माझ्या वकिलांसोबत कायदेशीर बाजू समजावून घेत होतो, असे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी आपली बाजू प्रसारमाध्यमांसोम मांडली.
राजधानी दिल्ली येथील काँग्रेस कार्यालयात पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिष घेतली. या वेळी त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. बुधवारी (21 ऑगस्ट 2019) सायंकाळी साडेआठ वाजणेच्या सुमारास चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद पाच मिनिटे चालली.
दरम्यान, पी चिदंबरम यांना न्यायालयाने दिलासा न देता त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर पी चिदंबरम यांना कधीही अटक होऊ शकते अशी स्थिती आहे. मात्र, गेले 27 तास पी चिदंबरम हे बेपत्ता होते. त्यानंतर 27 तासानंतर चिदंबरम हे अचानक काँग्रेस कार्यालयात उपस्थित झाले. तसेच, त्यांनी पाच मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. ही घटना अतिशय नाट्यमयरित्या घडली. (हेही वाचा, INX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही; आता प्रकरण CJI रंजन गोगोई कडे)
प्राप्त माहितीनुसार, काँग्रेस कार्यालयात एक महत्त्वाची पत्रकार परिषद असल्याचा निरोप प्रसाराध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्यात आला होता. त्यानुसार पत्रकार परिषदेसाठी विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कार्यालयात उपस्थित राहिले. या वेळी सुरुवातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित झाले. त्यानंतर पी चिदंबरम पत्रकार परिषदेत दाखल झाले आणि त्यांनी INX Media प्रकरणी आपली बाजू प्रसारमाध्यमांसमोर मांडली.