नो होल्ड बार्ड: 'नारायण राणे शिवसेनेत राहिले तर मी मातोश्री सोडेन' उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिली होती धमकी
सोबतच शिवसेना पक्ष आणि कट्टर शिवसैनिक राणे यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर प्रतिक्रिया देतो याबाबतही उत्सुकता आहे.
No Hold Bard - Autobiography of Narayan Rane: कट्टर शिवसैनिक (Shiv Sainik) ते शिवसेना (Shiv Sena) नेते आणि त्यानंतर काँग्रेस (Congress) मार्गे भाजप सीमेवरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष (Maharashtra Swabhiman Paksh) स्थापना असा प्रवास करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे आत्मचरित्र येऊ घातले आहे. प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच वृत्तपत्रांचे मथळे आणि वृत्तवाहिण्यांच्या ब्रेकिंग न्यूज वृत्तकाल व्यापायला लागल्या आहेत. 'नो होल्ड बार्ड' (No Hold Bard) असे नाव असलेल्या या आत्मचरित्रात अनेक धक्कादायक दावे केल्याचे सांगितले जात आहे. नारायण राणे हे शिवसेना पक्षात राहिले तर पत्नी रश्मी यांच्यासोबत आपण घर सोडून जाऊ, अशी धमकी शिवसेनेचे विद्यमान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिली होती, असा दावाही या आत्मचरित्रात केला आहे. या आत्मचरित्राची पाने आपल्या हाती लागल्याचा दावा करत एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
मुख्यमंत्री पद सोडावे लागल्याने मनोहर जोशी माझ्यावर नाराज होते. आज शिवसेनेची जी स्थिती झाली आहे त्याला मनोहर जोशी हेच जबाबदार आहेत. मनोहर जोशी हे शिवसेनेचे हितचिंतक असल्याचे असं वाटतं. पण, शिवसेनेच्या स्थितीला जोशीच कारणीभूत आहेत. शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा देत आपण शिसेना सोडली तेव्हा, बाळासाहेबांनी आपल्याला बोलावले होते. त्यावेळी राणेंना पक्षात ठेवलं तर मी आणि रश्मी घर सोडून जाऊ, असे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबंना बजावलं होतं, असा दावा नारायण राणे यांच्या , 'नो होल्ड बार्ड' या आत्मचरित्रात असल्याचे एबीपी माझाच्या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, नारायण राणे लिहणार आत्मचरित्र; 'अब आएगा मजा, सबका हिसाब होगा' म्हणत नितेश राणे यांनी केलं ट्विट)
दरम्यान, आपण शिवसेना नेमकी कोणत्या कारणामुळे सोडली, उद्धव ठाकरे यांनी लोकांना कसा त्रास दिला यांसह अनेक गोष्टींवर राणे हे आपल्या आत्मचरित्रातून मांडणार आहेत. तसेच, शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा सर्व पक्षांमधील प्रवासही राणे आपल्या आत्मचरित्रात कथन करणार आहेत. प्रसारमाध्यमांतील बातम्यांमधून तरी राणे यांचे आत्मचरित्र बरेच खळबळजनक असणार असे दिसते. सोबतच शिवसेना पक्ष आणि कट्टर शिवसैनिक राणे यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर प्रतिक्रिया देतो याबाबतही उत्सुकता आहे.